भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे – माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी
गेवराई:
शहरातील नवीन बसस्थानक समोर, सावता नगर गेवराई येथे सोमवार दि.६ मार्च रोजी माऊली भक्त कै.अंकुश बळीराम गिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सकाळी ९ ते ११ यावेळेत श्रीक्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे सुश्राव्य असे हरिकीर्तन होणार आहे.तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गिरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
विसाव्या शतकातील महानसंत विभूती वै.संत माऊली महाराज चाकरवाडीकर यांचे भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते कै.अंकुश बळीराम गिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तपोनिधी शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प.महादेव महाराज(तात्या)चाकरवाडीकर यांचे सोमवार दि.६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत हरिकीर्तन होणार आहे.तरी गेवराई सह पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, विनायक गिरी, अंबादास गिरी, सचिन गिरी सह गिरी परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.