पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची कारवाई
गेवराई प्रतिनिधी
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर ही काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्याशी लागेबांध ठेवून आर्थिक उलाढाल करत आहेत. यात गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी वाळूतस्कराशी हुजरे गिरी करुण करून आपला आर्थिक फायदा साधल्याने पोलीस अधिक्षकांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे पुन्हा एकदा गोदापट्टा चर्चेत आला आहे
.
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी यापूर्वीच गोदापात्रातील तिपाले नावाच्या कर्मचाऱ्याची बदली करून आपल्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या.तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्या संदर्भात सूचना केल्या होत्या
. गेवराई पोलीस ठाण्यातील बलराम सुतार (सहाय्यक फौजदार) आणि अशोक हंबर्डे (पोलीस हवालदार) या दोन कर्मचाऱ्यांनी वाळूच्या दोन टॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी न ताब्यात घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढूपणा करत आरोपींना साथ देण्याचे काम केले.त्यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी थेट गुरुवारी रात्री बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे गोदापात्रात खळबळ उडाली. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक न राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निलंबनाचा
मोठा इशारा एसपींनी या कारवाईच्या निमित्ताने जिल्हाभर दिला आहे
चोकट
शहरात अवैध धंदे सर्रास सुरु .?
गेवराई शहरात मटका ,जुगार,गुटका,धाब्यावर दारुची अवैध विक्री सर्रास सुरु आहे त्यामुळे तालुक्यात वाळु तस्करासह अवैध धंदे जोमात सुरु आहे त्यामुळे पोलीस अधिक्षक यांनी गेवराई पोलीस ठाण्यात भेट देवुन कारवाई संदर्भांचा आढावा घ्यावा तसेच शहरात वाढत असलेल्या घरफोड्या चोर्या घटनांच्या तपासा बाबत आढावा घ्यावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे