माधव बेदरे, सय्यद माजेद, नवनाथ धुरंधरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा आ.पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश
गेवराई (प्रतिनिधी) ग्रामीण भागात तालुकाभरात कार्यकर्त्यांना खोटे आश्वासन देऊन मोठ मोठे प्रवेश सोहळे घेऊन भूलथापा देत पक्षात घेण्याचा प्रताप काही राजकीय मंडळी करत आहेत. मात्र जनतेची प्रामाणिक कामे करण्याची तळमळ ज्या कार्यकर्त्यांत आहे ते कार्यकर्ते निस्वार्थपणे आपल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. याच कार्यकर्त्याला कायम आधार मिळाला पाहिजे यासाठी आपण निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कायम तत्पर आहोत असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला.
गेवराई शहरातील मोंढा नाका येथील युवा नेते माधव बेदरे व सय्यद माजेद व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हज कमेटी चे सदस्य सलिम बागवान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा.हाजी जे.डी.शहा, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, मा. नगराध्यक्ष सुशील जंवजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, ब्रह्मदेव धुरंधरे, नगरसेवक राहुल खंडागळे, अरुण मस्के,आप्पासाहेब कानगुडे, बदूभाई, भरत गायकवाड, माणिक बागवान, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, संदीप गांडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ.पवार यांनी सांगितले की, ज्यांना वाईट मार्गातून पैसा कमवायचा आहे फक्त तेच लोक ईतर पक्षात जात आहेत. मात्र ज्यांना प्रामाणिक जनतेची कामे करायची आहेत ते कार्यकर्ते आपल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असून या कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत. येणाऱ्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आसून ही सर्व कामे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतील व त्यांना ही आधार मिळेल असा विश्वास यावेळी आ.लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान यावेळी माधव आण्णा बेदरे, सय्यद माजेद नवनाथ धुरंधरे, शिवाजी पवार या प्रमुख कार्यकर्त्यांसह सोमनाथ कानगुडे, अरुण देशमुख, संदीप जाधव, सय्यद बासेद, राम शिरसाठ, व्यंकटेश राठोड, बालाजी करांडे, बाळू बयवर, किशोर टाक, यशपाल रोकडे, शंकर वाघमारे, गणेश येवले, रमेश येवले, रवी भराट, वैभव सराफ, गणेश बेदरे, श्रीनिवास भिसे, युवराज कानडे, कैलास कानडे, पुरुषोत्तम घाटूळ, अमर मिसाळ, देवा मुळे, अशोक काटे, परमेश्वर धापसे, गणेश सुकाळे, अकबर शेख, नारायण कोकाटे, शहादेव साखरे, महादेव खरात, नितीन खरसाडे, दत्ता झिरे, नाना चव्हाण, विष्णू भोसले, महादेव शिंदे, नाना सुतार, बापू इंदलकर व ताकडगाव येथील राष्ट्रवादीचे समर्थक शिवाजीराव पवार व त्यांचे कार्यकर्ते अशा असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आ.लक्ष्मण पवार यांनी स्वागत केले. दरम्यान अल्प संख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवन, जे.डी. शहा, संदीप गांडगे यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आ.लक्ष्मण पवार यांच्या प्रामाणिकपणाचे दाखले दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, राजे छत्रपती संभाजी प्रतिष्ठान, माधव अण्णा बेदरे मित्र मंडळ व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुशील टकले यांनी केले.