शारदा प्रतिष्ठानच्या विवाह नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
गेवराई
(प्रतिनिधी) – विवाहा सारख्या पवित्र संस्कारावर होणारा वारेमाप खर्च टाळून हुंड्यासह अनेक अनिष्ठ रूढी परंपरा बंद करण्यासाठी शारदा प्रतिष्ठानने सामुहिक विवाहाची चळवळ सुरू केली, समाजातील गरजू विवाह इच्छुक वधु- वरांच्या पालकांनी सोहळ्यासाठी तत्काळ नोंदणी करावी असे आवाहन रणवीर पंडित यांनी केले. ह.भ.प. दिलीप महाराज घोगे यांच्या शुभहस्ते शारदा प्रतिष्ठानच्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या विवाह नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
शारदा प्रतिष्ठानच्या २३ व्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या विवाह नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन चिंतेश्वर संस्थांनचे ह.भ. प. दिलीप महाराज घोगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणवीर अमरसिंह पंडित, भवानी बॅंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, उपाध्यक्ष मोहमद गौस, शारदा प्रतिष्ठानचे सचिव भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, कारखान्याचे संचालक बाबुराव काकडे, सावता परिषदेचे दादासाहेब चौधरी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, अविरतपणे २३ वर्षे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारी शारदा प्रतिष्ठान ही मराठवाड्यातील एकमेव संस्था आहे. विवाह सोहळ्यात सहभागी दापांत्याना संसारोपयोगी साहित्यांचा संच, वधु वरांचा संपूर्ण पोशाख, सोन्याचे मंगळसूत्र, पादत्राणे आदि प्रतिष्ठान कडून दिले जाते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संत महंत यांच्या उपस्थित ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चरात, नेत्रदीपक व आकर्षक रोषणाई मध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. गरजू वधु वर पालकांनी उपवर मुलांचे जन्म प्रमाण पत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी असे आवाहन रणवीर पंडित यांनी केले. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदा प्रतिष्ठानचा २३ वा सामुहिक विवाह सोहळा मंगळवार, दि. २ मे २०२३ रोजी सायं.६ः३५ वाजता जयभवानी मंदिर परिसर, शिवाजीनगर येथे आयोजित केला असुन या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या वधु-वरांना शासनाकडून मिळणारी शासकीय अनुदानाची रक्कम सुद्धा दिली जाते त्यामूळे या संधीचा लाभ इच्छुकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलतांना ह.भ.प. दिलीप महाराज घोगे म्हणाले की, सामाजिक जबाबदारी समजून घेऊन जाणकार नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आनेक वर्षापासून सामुहिक विवाह सोहळा हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. सामाजिक कामात सातत्याने शारदा प्रतिष्ठानचा सहभाग असतो. सामाजिक दायित्व ते सक्षमपणे पार पाढत आहेत. शारदा प्रतिष्ठानच्या या विवाह सोहळ्यासाठी जास्तीत जास्त विवाह नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सरवर खाँ पठाण, संजय पुरणपोळे, बंडू मोटे, जगन काळे, अवेझ शरीफ, दत्ता दाभाडे, ऋषिकेश बेदरे, वसीम फारुकी, सुनील सुतार, दिनेश घोडके, श्याम पाटील, सय्यद शिराज, सर्जेराव तावरे, वैभव दाभाडे, भगवान परळकर , कांता नवपुते, पवार श्यामभाऊ, संदिप मडके, राम चाळक, बाळू दाभाडे, शारिक भाई, अनील दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब नाटकर यांनी केले. सुत्रसंचलन सुधिर गाडे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.