गेवराई, (प्रतिनिधी):- मागील ३२ वर्षांपासून गेवराईत कार्यरत असलेल्या व सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या जयप्रकाश नागरी सह. पतसंस्था मर्या.गेवराईची निवडणूक अविरोध झाली असून नवनिर्वाचित सर्व संचालकांचे संस्थेचे मा.अध्यक्ष लक्ष्मीनारायण अट्टल यांनी अभिनंदन केले आहे.याच प्रसंगी बीड जिल्हयाचे पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने मा.अध्यक्ष लक्ष्मीनारायण अट्टल यांनी औरंगाबाद येथे प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेच्या वतीने संस्थेला गेवराई येथे येऊन लवकरच सदिच्छा भेट देण्याबाबत निमंत्रित करण्यात आले. याबाबत संस्थेला भेट देण्याचे मान्य केले असून संस्थेला आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सुद्धा आश्वासित केले आहे.
नवनिर्वाचित संचालकांमध्ये अट्टल लक्ष्मीनारायण श्रीरामजी,बेदरे रघुनाथ दादाराव,घोडके मुरलीधर दादाराव काकडे भास्कर भिकाजी,पठान अथरखाँ फकरुल्ला खाँ,तरोगे देवराव धोंडीबा,सराटे रंजित मनोहर,काकडे मंदाबाई संतराम,खडके शैला भिमराव,अट्टल अनुराग राधेशामजी व राठोड लहु देवराव यांचा समावेश आहे.नवनिर्वाचित संचालकांच्या सहकार्याने आगामी कालावधीमध्ये सभासदांच्या हितासंबंधी आवश्यक त्या नवनवीन व विश्वसनीय सेवा देवून संस्थेच्या भरभराटी व विकासाकरिता प्रयत्नशील राहण्याचा मानस याप्रसंगी संस्थेचे मा.अध्यक्ष लक्ष्मीनारायण अट्टल यांनी बोलून दाखविले.संस्थेच्या सर्व कर्मचारीवर्गांनी व सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.