एक महिण्या आगोदरच कसबा व चिंचवड मतदारसंघात विजयी उमेदवारांचे नावे सांगितले होते..
गेवराई /प्रतिनिधी
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. कसबा आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही उमेदवार दिले होते
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. तर चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली
या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवार २ मार्च रोजी लागला.
परंतु गेवराई शहरातील सावता नगर भागातील रहिवासी असलेले बाबासाहेब घोडके यांनी या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार याचा अचूक अंदाज आमच्या प्रतिनिधीला सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल एक महिण्या पुर्वी दि.५ फेब्रुवारी रोजी सांगितला होता .
कसबा येथे काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे निवडुन येतील तर चिंचवड येथे अश्विनी जगताप या निवडून येतील असा अचूक अंदाज येथिल बाबासाहेब घोडके यांनी काढला होता.
बाबासाहेब घोडके नेहमी अचुक अंदाज काढतात यवढंच काय तर बीड लोकसभा व गेवराई विधानसभाचे लागणारे निकाल एक महिन्या अगोदर सांगितले होते तसेच गेवराई तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती ग्रामपंचायत येथिल हा देखील अंदाज खरा ठरला होता शिक्षक संस्थाच्या झालेल्या निवडणुकीत नाशिक व छत्रपती संभाजी नगर, येथील निवडुन येणाऱ्यांचां देखील अंदाज खरा ठरला होता आणी काल झालेल्या निकालावरुन सिध्द झाले की बाबासाहेब घोडकेचा अभ्यासपुर्वक राजकीय अंदाज खरे ठरत आहेत