गेवराई, (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी मेजर प्रो. विजय सांगळे यांची मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रो. डॉ. विजय सांगळे यांना ३२ वर्षे अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी म्हणून मागील ३० वर्षांपासून ते अतिरिक्त जबाबदारी पार पाडत आहेत. याशिवाय महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून १७ वर्षे प्रशासनिक अनुभवही त्यांच्याकडे आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.रजनी शिखरे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अट्टल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी मेजर विजय सांगळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष श्री. अमरसिंह पंडित, श्री. शेख सलीम, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण आणि केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. दीपक आतकरे, ॲड. हरिश्चंद्र पाटील, श्री. आनंद सुतार, श्री. भगवान मोटे, श्री. जालिंदर पिसाळ, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनुने, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र राऊत, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पुरी, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मेजर प्रो. विजय सांगळे यांचे अभिनंदन केले.