संभ्रम आणि वास्तव
✍️प्राचीन काळापासून म्हणजेच इसवीसनाच्याही पूर्वीपासून आपल्या देशात “तिथी” हेच हिंदू कालगणनेचे एक परिमाण होते.
म्हणूनच आजही देशभर आपल्या दैवतांच्या,संत महंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथी तिथी नुसार साजऱ्या केल्या जातात.
या कालमापणात सरासरी एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यान्त म्हणजेच अमावस्या नंतरच्या पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होय.
आणि पौर्णिमे नंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष होय.
अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो.
शुक्ल पक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात.
उत्तर भारतात पौर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष येतो म्हणून त्यांच्या आणि आपल्या तिथित पंधरा दिवसांचा फरक आहे पण दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात.
या दोन्ही पक्षांतील फरकामुळे उत्तर भारतीय पंचांगातील तिथी आणि आमच्या पांचांगातील तिथी यात पंधरा दिवसाचा फरक आढळतो.
थोडक्यात सांगायचे झाल्यास यावर्षीची श्री संत सेना महाराज जयंती मध्य प्रदेश पांचांगा प्रमाणे वैशाख कृष्ण द्वादशी ही तिथी आहे, तर आपल्या राज्यातील पंचांगा प्रमाणे तिथी चैत्र कृष्ण द्वादशी ही आहे.दोन्ही तिथी एकच असून मराठी महिना जरी वेगळा असला तरी इग्रजी कॅलेंडर मधील तारीख मात्र १७ एप्रिल हीच आहे.
देशात सर्वत्र याच १७ एप्रिलला श्री.संत सैनाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना आपल्याकडे संभ्रम का आहे,याचे कारण मात्र कळत नाही.
आपलेच काही बांधव आणि संघटना ८ एप्रिल हीच खरी सेना महाराज जयंतीची तारीख असा दावा करताना दिसत आहेत.
मी स्वतः मध्यप्रदेशातील अगदी बांधवगड या महाराजांच्या जन्म स्थानापासून इतरही राज्यात संपर्क केला असता मला ८ मार्च या तारखीची कुठंही पुष्टी मिळाली नाही.
पुरातन काळापासून ते आज पर्यंत देवी देवतांच्या आणि थोर संत महंतांच्या जयंती अथवा पुण्यतिथी हिंदू पंचांगातील तिथी प्रमाणे साजरे करण्यास विशेष महत्व सांगण्यात आले आहे.
बांधवांनो,आजही जनमानसात आपला समाज सर्वात हुशार गणला जातो,
जर सगळीकडून १७ एप्रिल याच तारखेला असणाऱ्या तिथी बद्दल सांगण्यात येत आहे तर माझी आपल्या नाभिक समाजातील तमाम कार्यकर्त्यांना आणि संघटनांना नम्र विनंती आहे की,आपण डोळस भक्तीने आपल्या आरध्याच्या जयंती बाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
सर्व संघटनांनी आणि मान्यवर समाज कार्यकर्त्यांनी एकविचाराने निर्णय घेऊन निदान या वर्षापासून तरी सेना महाराजांची जयंती एकाचं दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा आणि इतर समाजाला आमच्या नाभिक समाजाच्या एकतेचे आणि योग्यतेचे दर्शन घडवावे ही एकमेव अपेक्षा
🙏🙏
धन्यवाद
*‼️जय श्री संत सेना महाराज‼️*
आपलाच,
संजय पंडित