गेवराई : प्रतिनिधी
महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षपदी सतीश बेदरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी सतीश बेदरे यांना या निवडीचे नियुक्तीपत्र दिले. दरम्यान या निवडीबद्दल सतीश बेदरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढत आलेली आहे. या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हि संघटना सक्रिय असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम आवाज उठवत आहे. दरम्यान या असोसिएशनचे बीड जिल्हा अध्यक्ष शरणागत यांच्या सुचनेवरुन संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी राज्य उपाध्यक्षपदी सतीश बेदरे यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र सतिश बेदरे यांना बुधवारी देण्यात आले असून यावेळी त्यांना पुढील वाटचालीस संघटनेकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तर महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करेन व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्व पत्रकार बांधवांसोबत असेल असे यावेळी सतिश बेदरे यांनी सांगितले. दरम्यान या नियुक्तीबद्दल सतिश बेदरे यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.