रेशम उत्पादनात गेवराई तालुका ३१८ कामे पूर्ण करुन प्रगती पथावर

0
129

या उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार सचिन खाडे, रेशम विकास अधिकारी विनीत पवार, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रशांत कोकुडे यांचा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव

गेवराई ( प्रतिनिधी ) मनरेगा आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रम शुक्रवार दि.३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून यामध्ये गेवराई तालुका हा रेशम उत्पादनात सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून प्रगती पथावर असल्यामुळे या उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार सचिन खाडे व त्यांच्या सहकार्याचा या कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे‌.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सातत्याने अग्रेसर भुमिका राखली असुन यामध्ये मोठया प्रमाणात अकुशल कामे व कुशल कामांमध्ये मत्ता निर्माण केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक कामांमध्ये अंगणवाडी बांधकाम, गायगोठा, शेळी मेंढी पालन शेड, कुकूटपालन शेड, शेततळे, गोदाम बांधकाम, सिंचन विहिरी, नाडेप / वर्मी कंपोस्ट बांधकामे, वनीकरण, (शेत बांधावरील), सामाजिक वनीकरण ( वनविभाग), शाळेला भिंत बांधकाम करणे, रेशम उत्पादन, शोषखड्डेची कामे आदी कामे. सन २०२० – २१ पासून मोठया प्रमाणात घेण्यात आले आहेत. वरील सर्व कामे सार्वजनिक व वैयक्तीक स्वरूपाची असुन सुविधा संपन्न कुटूंब मिशन व सर्वांगिण ग्रामसमृध्दी योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी व रोजगार सेवकांपर्यंत आहे. हा कामे यशस्वी केल्याबद्दल
राज्यातील ग्रामपंचायतस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या ६१ अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये रेशम उत्पादन संपूर्ण राज्यात सन २०२० – २१ पासुन – अदयापपर्यंत ७६३२ रेशीम उत्पादनाची कामे हाती घेण्यात आलेली असून त्यापैकी ९१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बीड जिल्हया अंतर्गत गेवराई तालुक्यात सर्वात जास्त ३१८ कामे पूर्ण करून प्रगती पथावर असल्यामुळे या उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार सचिन खाडे, रेशम विकास अधिकारी विनीत पवार, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रशांत कोकुडे यांचा मा.महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मा. विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानमंडळ, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री (रोहयो व फलोत्पादन), मा. मंत्री (इतर मागास वर्गीय व बहुजन), मा. मंत्री (आदिवासी), मा. मंत्री (वने), मा. मंत्री (ग्रामविकास), मा. मंत्री (कृषी), मा. मंत्री (महिला व बालविकास), मा. मंत्री (शालेय शिक्षण), मा. मुख्यसचिव व मा. अपर मुख्य सचिव (रोहयो) यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here