रं
गुरुजनांचा भव्य सत्कार हा प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या विशाल मनाचा सेवापुर्ती सोहळा…… माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
आपल्या स्वतःच्या सेवापुर्ती सोहळ्यात ज्यांनी आपल्याला शिकवले,घडवले अशा पहिली ते पदवी पर्यंतच्या गुरुजनांचा समारंभ पूर्वक भव्य सत्कार करून,आपल्या गुरूंचा सन्मान करणाऱ्या कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा हा अभिनव उपक्रम इतिहासात कोणीही राबवलेला नसेल. त्यांच्या या विचाराचा गौरव करायला हवा. गुरूंचा आदर करणारी आपली परंपरा आहे. गुरूंना श्रेष्ठ मानल्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही.गुरुजी मुळेच आपली जडण घडण झाली.त्यांनी दाखविलेल्या प्रकाश वाटा आपल्याला अंधारमुक्त करतात. ही कृतार्थ भावना शिष्याने कधीही विसरू नये. गुरुजनांचा भव्य सत्कार कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या विशाल मनाचा सेवापुर्ती सोहळा म्हणावा लागेल.असे माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयात प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात ते बोलत होते. संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.मनोगतात ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,प्रा.पठाण,प्रा.आशोक भोगाडे, कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव, प्रा.अभय शिंदे,नाट्यदिग्दर्शक मधुकर सोळसे,कवी हरिष हातवटे यांनी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या बहु आयामी, अष्टपैलू,व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. यावेळी सय्यद अल्लाउद्दीन यांचे गुरुजी दिगंबर देशपांडे,संभाजी नवसुपे,संपत गायकवाड,दिगंबर खांडके,शेख फरीद शेख चांद,एकनाथ धोंडे,मधुकर सोळसे,माजी प्राचार्य व्ही.एल.शिंदे,प्रा.डी.वाय.चाळक, प्रा.रामकृष्ण हंबर्डे,प्रा.एन.डी.पालवे,या गुरुजनांसह तसेच चिंचाळा येथील रामचंद्र बापू पोकळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी चिंचाळा येथील ग्रामस्थ सरपंच पंडित कल्याण पोकळे,माजी सरपंच दिगंबर पोकळे,ज्येष्ठ बंधू सय्यद शिराजुद्दीन, अशोक पोकळे,महादेव पोकळे,जालिंदर पोकळे,सय्यद मेहबूब,आत्माराम पोकळे,हबीब हुसेन,अनिल जगदाळे,सय्यद इसहाक भाई,पत्रकार उत्तम बोडखे,डॉ.राहुल टेकाडे,भाऊसाहेब निंबाळकर,विक्रम पोकळे,नामदेव भाऊ राऊत,पोपटराव घुले,अविनाश कदम प्रा.हरेश चाऊस,डॉ.बालाजी गुट्टे,डॉ.जावळे,डॉ.शेख इमराणा,लोकनेते विजय गोल्हार,प्रा.संभाजी झिंजुर्के,प्रा.भवर,बेदरे साहेब,जावेद पठाण, शेख निसार,अण्णासाहेब साबळे,आदर्श शिक्षक पी.वाय.काळे,संदीप धस,जयचंद नेलवाडे, डॉ.गलांडे,राजेंद्र लाड,पत्रकार संतोष दाणी,उपप्राचार्य अविनाश कंदले,सर्व प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते.डॉ. सातभाई यांनी सूत्रसंचालन केले.