गढी आणि भोजगाव येथे विकास कामांचा शुभारंभ
गेवराई, (प्रतिनिधी) शिवछत्र परिवार हा शब्द पाळणारा परिवार असून माजी आ.अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध विकास कामे सुरु आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी विकास कामांच्या संदर्भात जे-जे शब्द दिले, त्याची पुर्तता विविध विकास कामांचे उद्घाटन करून होत आहे. गढी आणि भोजगाव ग्रामस्थांना दिलेला शब्दही आम्ही पाळला असून यापुढील काळातही विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन युवा नेते रणवीर पंडित यांनी केले. गढी आणि भोजगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गढी येथे ९ लक्ष रुपये किंमतीच्या आरोग्य उपकेंद्राच्या विस्तार कामाचे आणि भोजगाव येथे ९.२० लक्ष रुपये किंमतीच्या शाळा-खोली बांधकामाचा भव्य शुभारंभ युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी गढी येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच अंकुशराव गायकवाड, उपसरपंच मंगेश कांबळे यांच्यासह बजरंग आर्सुळ बजरंग मोरे, दिलीपराव नाकाडे, डॉ.चंद्रशेखर गवळी, रंजित नाकाडे, शेख युसूफभाई, इसाक पठाण, श्रीचंद्र सिरसाट तर भोजगाव येथे जगदंबा संस्थानचे ह.भ.प.रघुनाथ महाराज निंबाळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय पवार, चेअरमन दत्तात्रय संत, पद्माकर संत, गणेश फरतडे, वसंत पवार, दिगांबर आडे, नितीन संत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, माजी आ.अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे सुरु आहेत. विविध योजनेअंतर्गत हजारो रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवछत्र परिवाराने जी-जी आश्वासने दिली ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु असून यापुढील काळातही उर्वरित विकास कामेही तितक्याच जोमाने केली जातील. ग्रामीण भागाला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आपल्या गावाचे विकासाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे असून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीर उभे रहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गढी येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णूपंत घोंगडे यांनी तर सुत्रसंचलन श्रीकांत सिरसट यांनी केले. यावेळी इसाक पठाण, मधुकर गायकवाड, गहिनीनाथ उगलमुले, परमेश्वर सिरसअ, अमोल ससाणे, सुमित काळम, राजू पठाण, भागवत नाकाडे, जालिंदर उगलमुगले, लक्ष्मणराव मगर, अंकुशराव इंगळे, महेश सिकची, सिताराम गव्हाणे, विठ्ठलमामा राऊत, शेख हकीम, तेजस घोंगडे, राजेंद्र गायकवाड, गोकुळ सिरसट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भोजगाव येथील कार्यक्रमाला महादेव शिंदे, गोविंद दातार, दिनकर संत, सर्जेराव काळे, श्रीरंग संत, संभाजी शिंदे, एकनाथ दातार, बाळासाहेब शिंदे, विष्णू मस्के, हरिभाऊ संत, ज्ञानेश्वर गिरी, अशोक काळे, विलास काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यक्रर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गढी आणि भोजगाव येथील ग्रामस्थांनी रणवीर पंडित यांचे वाजत-गाजत स्वागत केले.