तरुणांनी ठरवले तर यश नक्कीच मिळते. – मा.अमरसिंह पंडित
‘श्री टाईल्स, मार्बल व ग्रेनाईट’ चे उद्घाटन संपन्न
गेवराई दि.१ (प्रतिनिधी) एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तरुणांनी ठरवले तर यश नक्कीच मिळते. त्यासाठीची इच्छाशक्ती व संघर्षाची तयारी त्यामध्ये असावी लागते. असे प्रतिपादन मा.श्री.अमरसिंह पंडित यांनी केले. ते ‘श्री टाईल्स, मार्बल व ग्रेनाईट’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. उद्घाटक म्हणून ‘श्री.क्षेत्र चिंतेश्वर संस्थान’ चे ह.भ.प.महंत दिलीप बाबा घोगे व ‘श्री पंचमुखेश्वर संस्थान’, भाटेपूरी चे ह.भ.प.महादेव महाराज पुरी हे उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की काळ वेगाने बदलत आहे. गेवराई शहर व तालुका ही हा बदल सामावून घेत आहे. या बदलत्या काळानुसार तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन उद्योग व व्यवसाय सुरू केले पाहिजेत. त्यासाठी इतरांनी आग्रह केल्याने यश येणार नाही तर स्वतः मध्ये तशी इच्छा पाहिजे.
यावेळी आशीर्वाद पर बोलताना उद्घाटक ह.भ.प.महादेव महाराज पुरी म्हणाले की गौराई नावाला प्राचीन संदर्भ आहे आणि नावाप्रमाणेच गेवराई ची भरभराट होत आहे. ह.भ.प.दिलीप महाराज घोगे म्हणाले की जीवनामध्ये नैतिकता महत्वाची आहे. त्यामुळे युवकांनी व्यावसायिक नैतिकतेचे पालन करुन यशस्वी व्हावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामहरी काकडे यांनी केले. आभार श्री. धर्मराज काकडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. बाबू वादे यांनी केले. याप्रसंगी श्रेया मार्बल, पुणे चे डॉ.साईनाथ माखले मा.जि.प.सदस्य श्री. बाबुराव काकडे, ज.भ.स.सा.का.गढी चे मा. संचालक श्री.विश्वभंरराव काकडे मा. नगराध्यक्ष श्री.महेश (आण्णा) दाभाडे,
नगरसेवक श्री.भगवानराव घूंबार्डे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष श्री.दिपक (तात्या) अतकरे, गेवराई डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.सर्वोत्तम शिंदे, भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.श्री.बप्पासाहेब मोटे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष श्री.ऋषीकेश बेदरे, गढी चे सरपंच श्री.अंकुश गायकवाड,
से.स.सो.खांडवी चे चेअरमन श्री. अशोक नाईकवाडे, गढी ग्रामपंचायत चे सदस्य मा.श्री.विष्णुपंत घोंगडे, रांजणी चे सरपंच श्री.आसाराम रोडगे, धोंडराई च्या सरपंच कु. शितलताई साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ दाभाडे, नगरसेवक श्री.शामकाका येवले,आगर नांदूर चे सरपंच श्री.शाम जयसिंग काळे श्री.जालिंदर आण्णा पिसाळ, श्री. युवराज कोकरे, यांच्यासह गेवराई शहर व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.