गायत्री बाल संस्कार मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
121

क्युरिअस किड्सचे लॉन्चिंग

गेवराई (प्रतिनिधी ) – फेब्रुवारी 2023 रोजी गायत्री बाल संस्कार मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बंसल क्लासेसचे संचालक गोविंद सारडा लाभले होते प्रमुख अतिथी म्हणून विनो मोटे,पत्रकार प्रा. राजेंद्र बरकसे , म. फुले शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब आंधळे , उद्योजक परमेश्वर अंतरकर, सखाराम कानगुडे, शुभम जोशी व व्यंकटेश उबाळे उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी कु. शितल कोकाट, रहीमा बी ,प्रताप विठोरे,अभिषेक कचरे,गणेश लिंबोरे,सौरभ मडके,सिद्धेश्वर जंगले,ओम मस्के यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील टकले यांनी केले या कार्यक्रमांमध्ये वर्षभरामध्ये आयोजित कार्यक्रमाचे बक्षीस वितरण, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व डान्स स्पर्धा आयोजित केली होती आणि चिमुकल्यांनी त्यांच्या सुप्तागुणांचे उत्तमरीत्या प्रदर्शन केले.

या कार्यक्रमांमध्ये *फिनलंड शिक्षण पद्धती क्युरीयस किडस्वर अवलंबून असलेले या प्री प्रायमरी एज्युकेशन स्कूलचे लॉन्चिंगही करण्यात आले.याबदल सविस्तर माहिती विनोद मोटे यांनी दिली.तसेच शाळेच्या संचालिका श्रीमती सीता महासाहेब व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राम महासाहेब यांनी सर्वांचे आभार मानले.राधा-कृष्ण रूप सज्जा स्पर्धा निकाल कृष्णरूपमध्ये प्रथम-घोडके त्रिवेणी सचिन,
काझी आरान निहाल
माने राजवीर जयसिह
व राधा रूपसज्जात
भुसे पूनम उमेश
शिंदे परि प्रदीप
घुमरे गौरवी गणेश
उत्तेजनार्थ – राठोड आराध्या ज्ञानेश्वर, जाधव अनुष्का वैजीनाथ, गिरी ईशवरी धनराज यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. फॅन्सी ड्रेस स्पर्धा मध्ये
राठोड आराध्या ज्ञानेश्वर
शिंदे परि प्रदीप
जाधव अनुष्का वैजिनाथ
घोडके किरण सचिन
मोटे अथर्व पांडुरंग
उते. गिरी ईशवरी धनराज यांना बक्षिसे देण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here