उमरी येथे विविध महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजर
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराज, गुरु रविदास महाराज, माता रमाई, व संत सेवालाल महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ नेते सोनु भाऊ वाघमारे यांनी केले.
सर्व पक्षाचे कार्यकर्ते एका
स्टेजवर आणण्याचे काम सोनू वाघमारे यांनी केलं. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव कवळे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाकर हे होते. शिवराज पाटील बोलतांना असे म्हणत होते सोनू वाघमारे तुम्ही खूप छान कामगीरी केली. सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र एकाच स्टेजवर आणले व संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्याची संकल्पना तुम्हाला सुचली हे खुप कौतुकास्पद कामगिरी आहे. असा उपक्रम प्रत्येक गावात राबविण्यात आला पाहिजे.
तसेच कार्यक्रमासाठी आमंत्रित मंडळीं.
बापुसाहेब पाटील कौडगावकर सुधाकरराव देशमुख धानोरकर. अमोल पाटील ढगे गजानन श्रीरामवार आकाश सैदमवार सर्व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी प्रमुख उपस्थिती असलेले व प्रतिष्ठित मंडळीनी आपले विचार मांडले. त्या वेळेस समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होता.
.