नरहरी समाज सेवा प्रेरणा पुरस्कारांने राजेश पंडित सन्मानित

0
94

बीड प्रतिनिधी
अंबाजोगाई जि.बीड येथील ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते तथा सकल सोनार समाजाच्या उन्नती व उत्कर्षा साठी व समाजाच्या सामाजिक ऐक्यासाठी गेली कांही वर्ष सातत्यांने चळवळीत काम करणारे अखिल सोनार समाज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजाचे संघर्ष यात्री म्हणून परिचित असलेले व राज्यभरातील तळागाळातील सोनार समाज बांधव विश्वकर्मा वंशीय समाज बांधव यांच्या साठी अहोरात्रपने कार्यात असणारे समाजाचे सेवक असलेल्यां श्री राजेश (भाऊ) पंडित,रेणापूरकर यांना दि.२६ फेब्रुवारी रोजी पांचाळ सोनार समाज महामंडळ आयोजित गेवराई जि.बीड येथील वधुवर परिचय मेळाव्यांत राजेश पंडित यांनी केलेल्यां त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरवं म्हणून त्यांना “नरहरी समाज सेवा प्रेरणा पुरस्कार” हा बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार सौ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते शुभहस्ते प्रदान करण्यांत आला या वेळी व्यासपीठावर पांचाळ सोनार समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.धनंजयजी ( दादा) क्षिरसागर,तसेच ( राज्याधक्ष) श्री. प्रकाशराव पोतदार ( राज्य उपाध्यक्ष ) शिवश्री.रामानंदजी तपासे ( राज्य सचिव) श्री. सतिषजी महामुनी ( पिडीएफ बादशाह वधुवर सुचक) श्री. बाळकृष्णजी बहुलेकर,( महामंडळ महिला संस्थापक-अध्यक्षा) आदरणीय सौ.उज्वलाताई क्षिरसागर तसेच सातारा येथील पांचाळ सोनार समाज सेवा संस्थेचे ( सर्वेसर्वा ) आदरणीय श्री. दिवाकरजी पात्रेकर, माढा येथील( सराफ उद्योजक ) श्री. प्रमोदजी वेदपाठक व मोठ्यां प्रमाणांत उपस्थित समाज बांधव भगिनी यांच्या साक्षीने हा पुरस्कार प्रदान करण्यांत आला.राजेश भाऊ पंडित यांना मिळालेल्यां पुरसकारामुळे अनेकांना त्यांना भरभरूनं शुभेच्छा दिल्यां आहेत.या वेळी राजेश भाऊ पंडित रेणापूरकर यांनी देखिल भविष्यांत पुढे असेच समाज उपयुक्त कार्य व समाजातील ज्वलंत समस्या सोडविण्यां साठी प्रयत्नशील राहीलं असे सांगितले व पांचाळ सोनार समाज महामंडळाचे त्यांनी या निमित्ताने जाहिर आभार देखिल व्यक्त केले आहेत.
कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन निटनेटकेपनां व सर्वांची आस्थेवाईकपने चौकशी व त्यांची सर्वोतोपरी व्यवस्था करणाऱ्यां सर्व महामंडळाच्या टीमला धन्यवाद देवूनं त्यांचे मनपुर्वक अभिनंदन देखिल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here