अतिवृष्टीतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे द्यावीत – आ. लक्ष्मण पवार
गेवराई: प्रतिनिधी
अतिवृष्टीतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन आ. लक्ष्मण पवार यांनी केले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपात दिरंगाई होत आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांनी आप आपले कागदपत्रे दिले नाहीत. अशा शेतक-यांनी तात्काळ तलाठ्याकडे कागदपत्रे द्यावेत असे आवाहन आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की, गेवराई तालुक्यातील एकुण १८३ गावे अतिवृष्टीग्रस्त असुन त्यापैकी ९३ गावे आपलोड झाले आहेत. उर्वरित ९० गावच्या याद्या येणे चालु आहे तर नुकसानग्रस्त एकुण १ लाख२९ हाजार खातेदार आहेत त्यापैकी ४७ हाजार आठशे खातेदार आपलोड झाले आहेत तर उर्वरित याद्या तलाठ्या कडुन येणे चालू आहे. ज्या शेतकऱ्यांने कागदपत्रे दिले नाहीत त्यांनी तात्काळ कागदपत्रे देऊन लवकरात लवकर याद्या तहसील कार्यालयात येतील यासाठी तलाठी यांनी तातडीने याद्या दाखल करण्यात यावी अशा सूचना तलाठ्यांना दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने अनुदान दिले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनुदान शेतकऱ्या पर्यंत मिळाले नाहीत. अशा तक्रारी येत आहेत त्या संदर्भात आपण सूचना केली आहे.
उसतोडणी उसतोडणी उसतोडणी उसतोडणी उसतोडणीसाठी गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कागदपत्रे तलाठी कार्यालयात जाऊन किंवा सबधीत तलाठ्याकडे संपर्क करून अनुदानाची यादी तहसील कार्यालयात गेली किंवा नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन ही. आ. लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.