कंत्राटदार – अभियंता जबाबदार – गेवराई तालुक्यात अपघात , एकजण ठार

0
427

: गेवराई : मालेगाव येथून उमापूर कडे निघालेल्या दुचाकीला अपघात होऊन एकजण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार ता. 14 रोजी रात्री आठ वाजता घडली. अपघातात ठार व जखमी झालेले दोघेजण उमापूर परिसराती आहेत. मात्र, त्यांची नावे समजली नाहीत.

मालेगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आलेले दोघेजण, शुक्रवार ता. 14 रोजी रात्री निघाले होते. त्यांची दुचाकी उमापूर जवळ आली असता, खडीकरण झालेल्या टेमकाडावर जोरात आदळून फेकली गेल्याने, झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ते दोघे ही दुचाकीवरून उमापूर कडे निघाले होते. कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षा मुळे एका निष्पाप माणसाचा जीव गेला.
मालेगाव फाटे ते मालेगाव पर्यंत डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर होते. सहा महिन्यापूर्वी काम बंद करण्यात आले. केवळ खडीकरण करून काम अर्धवट सोडून देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मलिदा खाऊ वृत्तीच्या अधिकाऱ्यांकडून या कामाची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. कंत्राटदार आणि मलिदा खाणार्‍या अधिकाऱ्यांनी सहमतीने काम अर्धवट ठेवल्याने अनेक ठिकाणी टेमकाट आले. या वळणावर गाडी अचानक जम्प करते. त्यामुळे, वाहनांवरचे नियंत्रण सुटून अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठअधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आली होती. संबंधित कंत्राटदारास विनंती करून ही, त्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. वर्षभरात,मालेगाव – उमापूर रस्त्यावर किमान वीस वेळा अपघात झाला. एकवेळ तर, चार चाकी गाडी या ठिकाणाहून जम्प होऊन थेट शेतात जाऊन पडली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. दुचाकीस्वारास अनेक वेळा पडून जखमी झाले आहेत. दरम्यान, या ठिकाणी झालेल्या अपघाताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराची आहे. दोघांवर ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here