कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर तमाशा फडातुन निवृत्ती घेणार नाही -: श्री शुभमकुमार माने

0
10

संगमनेर /प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून प्रसार माध्यमांवर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक बातमी अशी की कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर हे तमाशा फडातुन निवृत्ती घेत आहे अशी नुकतच वृत्त व्हायरल झाल आहे.
संगमनेर तालुक्यात कोकणगाव येथील यात्रेच्या कार्यक्रमात कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर हे बोलुन गेले की माझ्या नंतर कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांची भाचे सुन अमृता थोरात, भाची पुजा थोरात तसेच कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचे चिरंजीव मा मोहित खेडकर यांच्या हातात तमाशा फड सोपवत आहे.
प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात असे म्हटले आहे की कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर हे तमाशा फडातुन निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे . याचे मी खंडण करत आहेत कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर हे तमाशा फडातुन जो पर्यंत जिव आहे तो पर्यंत मा रघुवीर खेडकर हे तमाशा पंढरी सोडणार नाही अशी माहिती कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचे स्विय सहाय्यक श्री शुभम माने खेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आणि वृत्ताचे खंडन करत आहे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर हे त्याच जोशात त्याच रंगात त्याच ढंगात रसिकांची सेवा करतील . असेहि कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांचे स्विय सहाय्यक श्री शुभम माने यांनी स्पष्ट सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here