गेवराई, (प्रतिनिधी) ः- दारिद्रय रेषेपेक्षा जास्तिचे उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारक शेतकर्यांना धान्या एैवजी प्रति लाभार्थी प्रतिमाह १५० रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास विलंब होत होता. आमदार विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणी गेवराई तहसिल कार्यालयात बैठक घेत पाठपुरावा करुन पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवुन दिला आहे. आ. पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे २ कोटी ७८ लाख ७५ हजार ४०० रुपये डीबीटी प्रणालीव्दारे महिला कुटूंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. गेवराई तालुक्यातील २२,१८० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे गेवराई तालुक्यातील महिला कुटूंब प्रमुखाच्या बँक खात्यावर थेट डिबीटी व्दारे २ कोटी ७८ लाख ७५ हजार ४०० रुपये जमा झालेले आहेत. माहे एप्रील २०२३ ते माहे मार्च २०२४ या कालावधीतील प्रति लाभार्थी प्रति माह १५० रुपये प्रमाणे ही रक्कम थेट डिबीटी प्रणालीव्दारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.आमदार विजयसिंह पंडित यांनी या प्रकरणी पुढाकार घेवुन मागील अनेक महिण्यांपासुन प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्यामुळे लाभार्थी शेतकर्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. आ. विजयसिंह पंडित यांनी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेसाठी इष्टांक वाढवुन देण्याची मागणी सुद्धा शासनाकडे केली आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज गेवराई तहसिल कार्यालयात प्रलंबित आहेत.
दारिद्रय रेषेपेक्षा जास्तिचे उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारक शेतकर्यांना धान्याएैवजी प्रति लाभार्थी प्रति माह १५० रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. गेवराई तालुक्यात त्याची अंमलबजावणी होण्यास होत असलेल्या विलंब प्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी तहसिल कार्यालयात संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीतुन त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना थेट संपर्क करुन आठवडाभरात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी केली होती. एपीएल शेतकरी योजनेचे गेवराई तालुक्यात १६,२१५ शिधापत्रिका धारक आहेत. प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतर यापैकी ५,१७० शिधापत्रिका धारकांनी सातबारा उतारा व इतर कागदपत्रे जमा केल्यामुळे हे लाभार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र झाले आहेत. इतर लाभार्थी शेतकर्यांनी केवायसी करुन सातबारा उतारा तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे. या योजनेत माहे एप्रील २०२५ पासुन १५० रुपये एैवजी १७० रुपये प्रतिमाह देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती या निमित्ताने आ. विजयसिंह पंडित यांनी दिली. आ. पंडित यांनी लाभधारक शेतकर्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवुन दिल्यामुळे तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.