कीर्तन महोत्सव – समन्वयक श्री माधव चाटे

0
234

कीर्तन महोत्सव – समन्वयक श्री माधव चाटे
संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांच्या स्मरणार्थ संस्कृती प्रतिष्ठान गेवराई आयोजित सत्संग कीर्तन सोहळा व भव्य शिवमहापुराण कथा योजने यांच्या संयुक्त विद्यमानाने कीर्तन महोत्सव भव्य आयोजन करण्यात आले आहे. अध्यात्माची संगत जर माणसाला लहानपणीपासूनच असेल तर त्यासाठी कीर्तन सोहळा असो के सत्संग काहीच अवघड असे वाटत नाही, म्हणून तर अध्यात्माची आवड असणारा प्रत्येक जीव हा तितक्याच भाव व मनातून करणारा सोहळा म्हणजेच सत्संग कीर्तन सोहळा होय,
‘आद्य’ म्हणजे आधीचा व ‘आत्मन्’ म्हणजे आत्मा. अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आपल्या आत्माचे ध्यान करणे. माणसाला माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होनाऱ्या कष्टापासून मुक्ती करून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे.
काळ आणि जड विश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. या विश्वात. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. १) पृथ्वी, २) आप (पाणी), ३) तेज (उष्णता), ४) वायू, व ५) आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व, २) रज आणि ३) तम यांची मिळून अष्टधाप्रकृती निर्माण झाली व ती ब्रम्हस्वरूपात विलसली. प्रत्येक प्राणीमात्रांचे शरीर हे ह्या अष्टधाप्रकृतीने बनलेले आहे. त्याच अष्टधाप्रकृतीचा विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. ही झाला जडवस्तु जी डोळ्यानां दिसते तिचा अभ्यास व जे अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा जो अनेक वर्षे तपश्चर्या करूनही समजत नाही; जो अदृष्य आहे; पण त्याच्याच सत्तेने हे जग चालते; तो ब्रह्मांडनायक परमात्मा, ईश्वर, भगवान; जो चराचरात भरला आहे; जो प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात विराजमान आहे; त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म होय.
जेंव्हा एखादा मनुष्य स्वतःपेक्षा अदभूत आणि विशाल असं काही अनुभवतो, तेंव्हा पारंपारिकदृष्ट्या त्याकडे पाहण्याची पद्धत म्हणजे, “हा देव आहे…” असे म्हणतो. देवा बद्दलची संपूर्ण कल्पना तशीच आहे – तुमच्यापेक्षा मोठी असणारी कोणतीही गोष्ट. मग तो एखादा मनुष्य असू शकतो, किंवा एखादा अनुभव असू शकतो किंवा ते निसर्गाचे एखादे स्वरूप असू शकते. पण हे आध्यात्मिक आहे का? नाही, हे फक्त जीवन आहे. मी जेंव्हा “फक्त जीवन” असे म्हणतो, तेंव्हा मी ती एक छोटी तुच्छ गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत नाही. ही एक सर्वात महान गोष्ट आहे. जेंव्हा जीवन तुमच्यासाठी एक जबरदस्त, शक्तीशाली, आनंददायी अनुभव बनते, तेंव्हाच याची निर्मिती कुणी केली असेल हे जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते.
आपण आपल्या परिसरामध्ये अनेक कीर्तन महोत्सांमध्ये सहभाग घेत असतो, पण खरंच आपण अध्यात्मची आवड आहे म्हणूनच होतो का ? की आपला देवावर विश्वास आहे, का आपण देवाला मानतो, आपल्या मनाला जे पटतं त्यावर आपण पटकन विश्वास ठेवून पुढे चालत जातो म्हणूनच म्हणतात अध्यात्माची आवड असणं खूप गरजेचे आहे अध्यात्माची आवड असेल तर अशक्य ही शक्य होतं असं म्हणतात.
संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यस्मरणात संस्कृती प्रतिष्ठानचे आयोजक श्री महादेव चाटे सर यांच्या प्रेरणेने गेल्या १८ वर्षापासून हे कीर्तन महोत्सव चे आयोजन चालू आहे. सुंदर सत्संग कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन वैष्णधाम, गजानन मंदिर, गजानन नगर गेवराई या ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केलेला आहे. यांचा हेतू प्रांजळ असून यामध्ये सर्व धर्मातील लोकांना एकत्र करणे म्हणजेच हा कीर्तन सोहळा होय असे मानणारे अनेक पुरुष मंडळी व महिला मंडळी आहेत, यापैकीच काही लोक हे या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करतात या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून जी भूमिका साकारणारे आहेत ते आ. माधव चाटे सर यांच्या संकल्पनेतून हा सत्संग कीर्तन सोहळा व तसेच भव्य शिवमहापुराण कथाचे आयोजन करण्यात आले आहे या कथाचे ह भ प प्रकाश महाराज साठे यांच्या स्मृत वाणीतून या शिवमहापुराणाचे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमासाठी विविध समितीचे आयोजन केले आहे मार्गदर्शक, स्वागत समिती, विशेष सहकार्य, महाप्रसाद वाटप समिती, असेल किंवा मंडप डेकोरेशन असेल पत्रिका छपाई असेल या सर्वांच्या सहकार्याने हे सत्संग कीर्तन सोहळा व भव्य महाशिवपुराण कथा यज्ञ चे आयोजन केले आहे उपस्थित असणारे हितचिंतक तसेच महाप्रसाद वाटप समितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने हा सत्संग कीर्तन सोहळा दिनांक – 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. असा भव्य स्वरूपात होईल यात शंका नाही असे समन्वयक श्री माधव चाटे यांनी सांगितले आहे.

श्री. प्रवीण गंगाधर कुलथे
९४२१४४१७८२ / ९०८२७६५६०९
उपसंपादक साय. साप्तहिक प्रकाश आधार
















        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here