पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता दुधाळ यांचा पोलिस महासंचालक प्रशस्तीपत्रने गौरव

0
266

बीड –
बीड जिल्हा पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता भीमराव दुधाळ यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला असून हे सन्मानपत्र नुकतेच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दत्ता दुधाळ यांना देण्यात आले..
गेल्या अनेक वर्षापासून पोलीस दलामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता दुधाळ यांनी बीड जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करीत असून बीड जिल्ह्यात हा बहुमान पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता दुधाळ यांना मिळाला आहे. दत्ता दुधाळ यांनी पोलीस दलात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून जातीय सलोखा राखण्यासाठी दत्ता दुधाळ हे सातत्याने प्रयत्न करीत त्यांची सामाजिक सलोखा राखण्याची पद्धत अद्वितीय असून यामुळे ते जिल्हाभरात सुपरिचित आहेत. त्यांच्या या गौरवाबद्दल बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here