गेवराई ( शुभम घोडके) गेवराई शहरातील ग्रामदैवत असलेले श्री. चिंतेश्वर संस्थान येथील महादेवाच्या मंदिरात नवस बोलला आणि तो पुर्ण झाला की फेडण्याची परंपरा कायम राखली जाते. श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित हे आमदार होण्यासाठी बोललेला नवस फेडला.
श्री.शाम म्हेत्रे यांनी विजयसिंह पंडित आमदार व्हावेत 11 ब्रह्मनांचा महारुद्र अभिषेक करण्याचा संकल्प केला होता. रणवीर पंडित यांच्या हस्ते महाआरती करून पुर्ण केला .२०२४ च्या गेवराई विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मायबाप जनतेनी राजे साहेबांना विधानसभेत पाठवले. आपला नेता आमदार झाल्याचा आनंद नवस बोललेले श्री शाम म्हेत्रे यांना होता. नवस फेडायचा असा संकल्प करत दिनांक 27 जानेवारी सोमवार रोजी चितेंश्वर संस्थान येथे 11 ब्रह्मनांचा महारुद्र अभिषेक करून नवस फेडला यावेळी श्री रणवीर काका पंडित व श्री शाम म्हेत्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी शिवछत्र परिवारातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.