आंबेजोगाई जवळ भीषण अपघात

0
577

अंबाजोगाई – लातूर महामार्गावरील अंबासाखर कारखाना जवळ स्विफ्ट कार आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना आज दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ७.०० वाजन्याच्या दरम्यान घडली आहे. या भीषण अपघातात स्विफ्ट कार मधील दोघांचा जाग्यावर मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ मांजरसुंबा येथून पुढे अंबासाखर कारखाना मार्गे रेणापूरकडे महामार्गाने जात असताना अंबासाखर कारखाना जवळ समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर शिफ्ट कारची धडक झाल्यामुळे कारचा चुराडा होत शिफ्ट कार मधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला झाला. यात मयत 1) बालाजी शंकर माने वय 27, 2) फारुख बाबुमिया शेख वय 30, 3) दिपक दिलीप सावरे वय 28, 4) ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू) यातील जख्मी 1) मुबारक शेख, 2) अजिम पाशुभाई शेख 30 वय (पोलीस निवड) स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हा महामार्गवर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामार्ग चौपदरी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here