मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेत ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांना मिळाले यश

0
173

बीड वार्ताहर :
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पीएच.डी प्रवेश पूर्व परीक्षा [ पेट ]२०२४ चा निकाल शनिवार ता. ७ रोजी जाहीर करण्यात आला असून, ज्येष्ठ पत्रकार सुभाष अच्युतराव सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारिता विषयात ते पेट पात्र झाले आहेत. त्यामुळे, त्यांना पत्रकारितेत पीएच.डी करण्याची संधी मिळणार आहे. बीड जिल्ह्य़ातील पत्रकारांनी श्री. सुतार यांचे अभिनंदन करून
पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाने सेंटर बेस्ड टेस्ट [ सीबीटी ] ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून ५०४० विद्यार्थी बसले होते. त्या पैकी २००८ विद्यार्थी पात्र झाले आहेत. एकुण ५३% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांनी ही, मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पेट परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांना पत्रकारितेत पीएच.डी करण्याची संधी मिळणार असून, श्री. सुतार हे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेत काम करत आहेत. या आधी झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट परीक्षेत ते पात्र झालेले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात असून, पुढील कार्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांना साप्ताहिक प्रकाश आधार परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here