गेवराई प्रतिनिधी :- गेवराई येथील सीएलआयए अनिल मुंडे यांची मुंबई येथे झालेल्या झोन एक्झिक्युटिव्ह कमिटी या बैठकीत वेस्टर्न झोन सीएलआयए महाराष्ट्र , गोवा, गुजरात या तिन राज्यासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
गेवराई शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असलेले भारतीय आयुर्विमा महामंडळात ( एलआयसी) मध्ये गेल्या २१ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन रविवारी रोजी मुंबई येथील वेस्टर्न झोन एक्झिक्युटिव्ह कमिटी या बैठकीमध्ये वेस्टर्न झोन (सीएलआयए) महाराष्ट्र , गोवा, गुजरात या तिन राज्यासाठी अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी ऑल इंडिया लियाफी जनरल सेक्रेटरी श्रीनिवास चारी, तेरकर काका, कमलेश सांधीया व हजरीमल पुरोहित सह सुरेंद्र अकनगिरे विभागीय अध्यक्ष लियाफी संघटना छत्रपती संभाजीनगर, रमेश होळंबे विभागिय सिएलआयए अध्यक्ष लियाफी संघटना छत्रपती संभाजीनगर, बळीराम बीराजदार सेक्रेटरी वेस्टर्न झोन सह आदि उपस्थित होते.
Home Uncategorized वेस्टर्न झोन सीएलआयए महाराष्ट्र , गोवा, गुजरात या तिन राज्यासाठी अध्यक्षपदी अनिल...