गेवराई, (प्रतिनिधी) ः- गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते साधु, संत-महंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे. शिवछत्रप्रेमींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि.३ ऑक्टोबर पासून गेवराई शहरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरु असलेल्या भागवत कथेमुळे गेवराईचे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक नामांकित किर्तनकारांची सेवा सप्ताहभर सुरु आहे. गुरुवार, दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडीचे ह.भ.प. महादेव महाराज, श्री क्षेत्र बंकटस्वामी संस्थानचे प्रमुख ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री क्षेत्र रामगडचे महंत ह.भ.प.योगीराज महाराज, श्री क्षेत्र मत्स्येंद्रनाथ गडाचे ह.भ.प.जनार्धन महाराज, ह.भ.प.नामदेव महाराज, ह.भ.प.दत्ता महाराज गिरी, ह.भ.प.संभाजी महाराज, ह.भ.प.मुरलीधर महाराज गवारे, ह.भ.प.सोनाली दीदी करपे, यांच्यासह साधु, संत-महंत आणि गेवराई तालुक्यातील वारकरी सांप्रदायात काम करणारे किर्तनकार, गायक, वादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गेवराई विधानसभा मतदार संघातील सर्व साधु, संत-महंत, किर्तनकार यांचाही हृदय सत्कार अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य सत्कार समारंभानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे, भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजन समितीने केले आहे. मागील सप्ताहभर सुरु असलेल्या किर्तन महोत्सवाला भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शिवछत्र परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून किर्तन महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. या तिसऱ्या वर्षीही आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद भाविक भक्तांनी दिला आहे. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुनःश्च संयोजन समितीने केले आहे.
Home Uncategorized माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्याअभिष्टचिंतन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा : अभिष्टचिंतन सोहळा...