नांदेड (प्रतिनिधी उज्वला गुरसुडकर)
शिरपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिरपूर तालुका विधानसभा समन्वयकपदी विकास सेन यांची सर्वांनूमते निवड करण्यात आली. विकास सेन यांचे सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान पाहून पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आह शिरपूर तालूका कक्ष शहर प्रमुख म्हणून मागील काही वर्षांपासून त्यांनी काम पाहिले असून या पदाला अतिशय समर्पक न्याय दिलेला आहे.
शिवसेना धुळे जिल्हा ग्रा.चे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे व उपजिल्हा प्रमुख भारतसिंह राजपूत यांनी शिरपूर तालुक्यातून विकास सेन यांचे एकमेव नाव या पदासाठी पाठविले होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सह पक्ष श्रेष्ठींनी विकास सेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून शिवसेनेला न्याय देणाऱ्या शिवसैनिकाची शिरपूर तालुका विधानसभा समन्वयक पदासाठी निवड केली असे सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित करून सर्वत्र जाहीर केले विकास सेन यांच्या निवडीबद्दल उद्धव बाळा साहेब ठाकरे शिवसेना कार्यालयात त्यांच्या सत्कार करण्यात आला असून शिरपूर शहरासह सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. विकास सेन यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या शिरपूर तालुका विधानसभा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा.