गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले व माँ संतोषी अर्बन परिवारासोबत गेल्या ६ वर्षांपासून चे सोबत साथ देऊन अत्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या व शाखा व्यवस्थापक पदाची जबाबदारी संपूर्णपणेने पार पडणारे तसेच पत्रकारिता मध्ये पदवी अभ्यासक्रम घेवून पत्रकारीता पासून लांब असलेले श्री. प्रविण गंगाधर कुलथे पत्रकारिता लेख व बातम्यांची दखल घेऊन साप्ताहिक प्रकाश आधारच्या उपसंपादक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक वर्षापासून लेख , प्रखर शब्दातून जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून संबंधित शासकीय कार्यालयांना धारेवर घेऊन तळमळीने अभ्यास करून मुद्देसूद मांडणी करत राजकीय विश्लेषण करून त्यावर शब्द स्वरूपात व्यक्त होऊन समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केलेले आहे त्यामुळे आता जाहिरात आणि बातमीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असे समजावे आणि त्याची दखल घेऊन प्रकाश आधार कार्यालयाच्या माध्यमातून संपादक सुनीलजी पोपळे यांच्या सूचनेवरून कुलथे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.