रेल्वे अधिकाऱी श्री. कदम यांची मुलगी चि.सौ.का. योगिता आणि चि. अजिंक्य यांचा पर्यावरण पूरक लग्न सोहळा

0
424

सोलापूर प्रतिनिधी

आज मंगळवार दिनांक 09/07/2024 एक अत्यंत सुंदर आणि पर्यावरणाचा संदेश आणि लग्न असा दुग्धशर्करा सोहळा मोठ्या थाटात रेल्वेच्या ऑफिसर क्लब विजापूर रोड, येथे पार पडला.

रेल्वेतील अधिकारी व सोलापूरचे पर्यावरण प्रेमी श्री शिवाजी कदम यांच्या यांच्या नियोजनात मुलीचा लग्न सोहळा पर्यावरण पूरक असावा असा उद्देश ठेवून एका विशिष्ट पैलू ने मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला.

त्यांच्या कुटुंबीयांकडून सुबक अशा लग्नपत्रिका रुमालावर छापण्यात आल्या. तसेच झाडे लावण्यासाठी त्याची जपून करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी फलक लावण्यात आले.
तत्पूर्वी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी हळदी दिवशी रेल्वे कॉलनीत 5 झाडे लावण्यात आली.

लग्नामध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचा कर्कश आवाज करणारी साऊंड सिस्टिम व डीजे लावण्यात आला नाही. लग्न समारंभात जेवणाचा व पाण्याचा अपव्यय टाळण्याचा वाढपींना व पाहुण्यांना सल्ला देण्यात आला.
सिंगल यूज प्लास्टिक चा वापर टाळण्यात आला, पिण्याचे पाणी कागदी गलासात दिले गेले.
वीदाई समारोहसाठी बॅटरी गाडी (e vehicle) चा वापर करण्यात आला.

लग्न समारंभात उपस्थित सर्वांसाठी “एक झाड” तसेच “झाडे लावा झाडे जगवा” अशी संदेश असणारी कापडी पिशवी देण्यात आली. या उपक्रमाचे दोन्ही कुटुंबातील पाहुण्यांनी उपस्थित अधिकारी वर्ग कर्मचारीवर आणि इतर सर्वांनी कौतुक केले. श्री कदम यांनी लग्न सोहळा पर्यावरण पूरक असावा असा संदेश सर्वांनाच देण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here