घडी विक्री व्यवसाय करत सामाजिक कार्य करणारे खदिर मामु

0
331

32 वर्षापुर्वी सुरू केलेला घडी व्यवसाय आजही सुरळीत सुरू

अनिल आगुंडे/गेवराई
गेवराई शहरांमध्ये खदीर अलाउद्दीन बागवान यांनी सुरू केलेल्या टायटन वॉच कंपनी या घडी विक्रीच्या व्यवसायाला 32 वर्षे पूर्ण झाले खदीर अलोहोद्दीन बागवान म्हणजे खदीर मामु अगदी मनमिळाऊ स्वभावाचे शांत संयमी कायम सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे पत्रकार तसेच आपल्या व्यवसायात देखील ग्राहकांशी जवळीक टिकून ठेवणारे प्रामाणिकपणे ग्राहकांना सुविधा पुरवणारे खदीर मामू यांनी शास्त्री चौक गेवराई येथे ई.स‌ 1992 मध्ये टायटन वॉच कंपनी म्हणजेच घडी विक्री व्यवसाय सुरू केला आज ही या घडी विक्री व्यवसायाला लाखो ग्राहक जोडलेले आहेत गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात खदीर मामू यांच्या कडून घडी खरेदी व दुरुस्ती करण्यासाठी ग्राहक येतात खदीर मामू यांची टायटन वॉच कंपनी ही घडी रिपेअर (दुरुस्ती) व घडी विक्री करणारी दुकान गेवराई शहरातील बीएसएनएल ऑफिस रोडला असून खदीर मामू प्रामाणिक पणे ग्राहकांना सुविधा पुरवतात.
खदीर अलाउद्दीन बागवान हे बीडचे राउफ शेठ यांच्या कडे गेवराई शहरात नगरपरिषद जवळ असणाऱ्या घडी दुकानांमध्ये 1992 अगोदर काही वर्ष घडी दुरुस्ती करण्याचे काम शकत होते
राउफ शेठ यांच्याकडून घडी रिपेरिंग व व्यवसायाची माहिती घेऊन राउफ शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली खदीर मामू यांनी शहरातील शास्त्री चौक येथे इसवी सन 1992 मध्ये टायटन वाच कंपनी या नावाने आपला स्व:त चा व्यवसाय सुरू केला आज या व्यवसायाला तब्बल 32 वर्षे पूर्ण झाले.
अगदी गरीब कुटुंबातील खदीरमामु यांनी आपली मेहनत चिकाटी व आपल्या जिद्दीवर गेवराई शहरात दुकान सुरू केली.
खदीर मामु यांना त्यांच्या स्वभावाचा देखील त्यांना व्यवसायात चांगला फायदा झाला खदीर मामू चा स्वभाव म्हणजे सर्व समाजातील नागरिकांना कायम सोबत घेऊन व त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांना नक्कीच फायदा झाला आहे.लहाना पासून थोरा पर्यंत आदरपूर्वक बोलणे ग्राहकांशी आपुलकी व ग्राहकांना वेळेवर सुविधा देण्यामुळे आज घडी विक्री व्यवसाय व घडी दुरुस्ती मध्ये गेवराई शहरात खदीर मामू यांचे नाव सर्वजण आवर्जून सांगतात.
सामाजिक कार्याची आवड असणारे खदीर मामू सर्वांच्या परिचयाचे आहेत मामु यांचे पत्रकारितेत देखील चांगले नाव आहे.
शहरा सह ग्रामीण भागात मामुचा संपर्क असल्याने त्यांच्या कडे बरेच लोक समस्या घेऊन येतात येणाऱ्या लोकांची समस्या सोडविण्यासाठी मामु कायम उपलब्ध असतात.
टायटन वॉच कंपनी या घडी दुकानांमध्ये खदीर मामू सामाजिक कार्य देखील खूप मोठ्या प्रमाणात करतात 32 वर्षापासून ग्राहकांशी जोडले गेलेला व्यवसाय आजही खदीर मामू व त्यांचा मुलगा अत्यंत व्यवस्थित करताना दिसुन येते
पत्रकारिता, व्यवसाय, समाजकार्य व राजकारण कसे करावे हे मामु कडून शिकण्या सारखं आहे.
आणि हे खदिर मामुलाच जमतं.
आपल्या व्यवसायात अशीच वाढ होत जावो हिच प्रार्थना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here