भगवानराव ( अण्णासाहेब ) बिडवे नावारूपाने सर्वगुणसंपन्न भाग्यवंत यशवंत तेज पुंज मुर्ती लहान पण कीर्ती महान असणारे. झुंजार लढवय्या समाज सुधारक समाज हक्कासाठी व अधिकारांसाठी कुठलाही स्वार्थ न बाळगता प्रत्येक कार्यास गती व प्रगतिशील प्रयत्न करत अहोरात्र झटूण समाज हितासाठी एक पाउल पुढे यशस्वीरित्या वाटचाल.
नाभिक समाजातील लोकांना न्याय, हक्क,व अधिकार मीळवूण देणारे, धुरंदर व्यक्तिमत्व.
समाजातील अडीअडचणी प्रत्यक अप्रत्यक्षपणे निवारण करून समस्यांचे समाधान मिळवण्याची जिद्द वारसाहक्काने जोपासत आहेत.
अशाच व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात…
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नेते व राष्ट्रीय नाविक एकता महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब बिडवे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे रौप्य महोत्सवी राज्यव्यापी महा अधिवेशन 50 ते 60 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न केले.
अधिवेशनानंतर नाभिक समाजाच्या मागण्याबाबत शासन दरबारी सचिव पातळीवर मंत्रालयात प्रथमच बैठकीचे आयोजन होऊन समाजाच्या सर्व मागण्याबाबत खाते निहाय कामकाज चालवले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष असताना 30 मे 2011 रोजी नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी अण्णासाहेब बिडवे यांच्या नेतृत्वाखाली आजाद मैदान मुंबई येथे न भूतो न भविष्यति असा लाखो समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
अण्णासाहेब बिडवे हे नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी अद्याप पर्यंत सतत संघर्ष करीत आलेले आहेत, समाजाच्या प्रश्नाची जाण नेता, कृतिशील नेतृत्व, अभ्यासू वृत्ती व कुशल संघटक असा ठसा त्यांनी कार्यकर्तुत्वाने समाज मनावर उमटविला आहे.
संख्येने अल्प असलेला नाभिक समाज सातत्याने सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेला तसेच राजकीय दृष्ट्या पुरेस प्रतिनिधित्व नसलेल्या नाभिक समाजाचे सामाजिक प्रश्न शासन दरबारी प्रदर्शित करून सोडविण्यासाठी उपोषणे, धरणे, मोर्चे, मेळावे यासारखे अनेक आंदोलने, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करून राज्यस्तरावर नाभिक समाजात सामाजिक न्यायहक्कासाठी समाजजागृती केली. समाजमनाला लढण्याचे सामर्थ्य दिले,
महामंडळाचे महाराष्ट्रात सलग संघटन उभारून आंदोलनाची भूमिका घेत अण्णांनी एक नवा संघर्षाचा मार्ग दाखविला. सामाजिक, राजकीय वर्तुळात नाभिक समाजाची दखल घेतली जाईल,, अशी स्थिती निर्माण करण्यात अण्णा यशस्वी ठरले
असंघटित व विखुरलेला नाभिक समाज संघटित करण्यासाठी स्वर्गीय शंकररावजी जगताप यांनी समाजाला राजकीय अनुभवातून मार्गदर्शन केले, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय स्व.हनुमंतराव साळुंखे यांनी प्रबोधनातून जागृती करत समाजाला दिशा दिली, तर स्व. ना. भू. संगमवार यांनी राज्यभर हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रत्यक्ष जनसंपर्कातून संघटनकार्य उभारले, याबरोबरच स्व. शशिकांत चव्हाण यांनी नाभिक समाज व समाजाच्या थोर व्यक्ती यांच्या जीवनावर प्रेरणादायक पुस्तकरूपाने निर्मिलेल्या साहित्यातून समाजाला प्रेरणा दिली. आणि वामनराव देसाई यांनी कार्यालयीन कामकाज सांभाळून अनेक वर्ष नाभिक वार्ता या अंकाचे लेखन आणि प्रकाशन कार्यात पुढाकार घेतला
समाजातील या नेतृत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अण्णासाहेब बिडवे यांनी सामाजिक न्यायासाठी संघर्षाची आंदोलनात्मक भूमिका घेऊन 30 मे 2011 च्या आजाद मैदानावरील लाखोंच्या मोर्चाने नाभिक समाजाच्या संघटित शक्ती शासनकर्ते व राज्यकर्त्यांना दाखवून दिली,
नाभिक समाजासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर राहून, ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी ओबीसींचे नेते माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय समता परिषदेतही राज्यस्तरावर कार्यरत राहिलेले आहेत.
समाज संघटित करीत असतानाच अण्णासाहेबांचा महाराष्ट्रराज्यासह देश पातळीवर अनेक राज्यात जनसंपर्क वाढला, देशातील अनेक सामाजिक संघटनांवर नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली, नेतृत्व, कर्तुत्व आणि वकृत्वामुळे अण्णासाहेब एकाच वेळी अनेक स्तरावर कार्यरत असल्याने कार्यानुभव आणि जनसंपर्कच त्यांना पुढे राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यास उपयोगी ठरला,
अण्णासाहेबांचे संघटन कौशल्य, अभ्यासुवृत्ती, सामाजिक कार्याची तळमळ, माणसं जोडण्याची कला, हाती घेतलेले कार्य यशस्वी होईपर्यंत कष्ट करण्याची मानसिकता अशा सर्वकष नेतृत्वगुणांमुळेच अण्णा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर समाजमनावर राज्य करू शकले, आज त्यामुळेच देशातील सर्वच राज्यात समविचारी कार्यकर्ते व नेत्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे.
त्यात भर म्हणून भारतरत्न जननायक करपुरी ठाकूर यांचे आचार, विचारातून प्रेरणा घेऊन जननायक करपुरी ठाकूर ओबीसी संघटन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रघुवीर जी श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले, असून या राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची धुरा अण्णा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
भारतरत्न जननायक करपुरी ठाकूर यांनी समाजातील मागास व अति मागास वर्गाच्या उन्नतीसाठीआपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. इतर. मागासवर्गीय समाजाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी मंडल आयोगाच्या निर्मितीपूर्वी दहा वर्ष अगोदर बिहार राज्यात ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण लागू केले होते, त्या काळात त्यांना उच्च वर्णीयांचा अर्थातच सवर्णांच्या प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता. समाजातील सामान्य अतिसामान्य घटकांना न्याय दिल्यामुळेच त्यांना जनतेतून जननायक ही सन्मानजनक उपाधी मिळाली. त्यांच्याच प्रेरणेतून जननायक कर्पुरी ठाकूर ओबीसी ओबीसी संघटना ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत झालेली आहे.
तळागाळातील पिचलेला अनेक वर्ष न्यायासाठी, हक्कासाठी आसुसलेल्या असंघटित समाजाला संघटित करण्यासाठी, समाजातील सर्व घटकांना संघटित करून संघर्ष करण्याची भूमिका घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा .श्री रघुवीरजी श्रीवास यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री. अण्णासाहेब बिडवे यांनी कार्यारंभ केला आहे.
8 ऑगस्ट २०२४ रोजी अण्णासाहेब बिडवे हे वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 40 वर्ष सातत्याने समाजाला संघटित करीत समाजाच्या उत्कर्षासाठी, कार्यरत राहिलेले आहेत. त्यांनी समाजकार्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले आहे. अण्णांनी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे, हा एकच ध्यास घेऊन त्यांनी आजपर्यंत कार्य केले आहे
नाभिक समाजाने गत पन्नास वर्षाहून अधिक काळा पासून सर्वांगाने उभारलेला सामाजिक संघर्षाचा लढा पुकारलेला आहे. या लढ्यात आजतागायत महाराष्ट्रातील अनेक नेते व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. या सर्वांचे विस्मरण होऊन न देता मिळेल ती माहिती संकलित करूनअण्णा साहेबांनी केलेले कार्य, आणि प्रत्यक्ष अनुभवातून "संघर्ष नाभिक समाजाचा" या पुस्तकाची निर्मिती होत आहे. या पुस्तकातून गतकाळात समाजाच्या हितासाठी लढलेल्या नेते व कार्यकर्त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांनी केलेला त्याग या यासह सामाजिक घटनांचा आढावा घेत, अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित प्रकाशन संस्था व लेखकाकडून साकारण्यात येतआहे.भावी पिढीला निश्चितच गतकाळातील सर्व संघर्ष लढ्यातील प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील.
संकलन:
सौ. उज्वला गुरसुडकर
नांदेड प्रतिनिधी
9764887662
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240728-WA0052.jpg)