आष्टी प्रतिनिधी
कष्ट करणाऱ्या पिढीकडून सुसंस्कृतपणा टिकून राहतो.कष्ट हे माणसाला परिश्रमाची महती नेहमी आठवणीत आणून देतात.त्यामुळे कष्टाची अवहेलना होत नाही.प्रत्येक माणसाला आयुष्यात सुखदुःखाचा सामना करावाच लागतो.खरंच चिंता आणि चिता या शब्दातली चमत्कृती संतांनी यासाठीच पटवून दिलेली आहे.मैत्रीचे संबंध जातपात,नाते या पलीकडचे असते.प्रा.वाल्मीक बन आणि प्रा.ज्ञानेश्वर नवले या दोघातली मैत्री अभेद्य आहे.त्या दोघांनी सुखाबरोबर दुःखही जवळून पाहिले आहेत.त्या दोघांच्या मैत्रीचे अश्रू मी समजू शकतो. प्रा.वाल्मीक बन यांनी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी हंबर्डे महाविद्यालयात आपली 32 वर्षाची सेवा पूर्ण केली.त्यांनी आपल्या भावी आयुष्यात सामाजिक चळवळीत भाग घेऊन आपल्या गावातल्या समस्यांकडे लक्ष द्यावे.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.यावेळी प्रा.वाल्मीक बन यांचा सपत्नीक सेवा गौरव पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला.उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे,सचिव अतुल शेठ मेहर,दिलीप शेठ वर्धमाने, तय्यब शेठ,प्रा.महेश चौरे,सुभान शेठ पठाण,सर्व संचालक मंडळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.यावेळी उपप्राचार्य अविनाश कंदले,प्रा.जयनूल्ला पठाण,प्रा.ज्ञानेश्वर नवले,कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन,चिरंजीव वैष्णव बन,सुनबाई अमृता बन,पुरी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,डॉ.रवी सातभाई यांनी केले.यावेळी माजी उपप्राचार्य दिलीप घायाळ,प्रा.शिवाजी झाडे,पर्यवेक्षक अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक वृंद,प्रा.वाल्मीक बन यांच्या मातोश्री,यांचे पाहुणे उपस्थित होते.