गेवराई प्रतिनिधी
शहरातील हॉटेल मध्ये आचारी म्हणुन काम करनाऱ्या तरुणाचा संशयस्पद मृत्यूदेह सापडल्या मुळे खळबळ उडाली आहे
या घटने संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की गणेश नाथा आबदगिरे वय38 वर्ष रा.मुंगी हल्ली मुक्काम . यशराज नगर, गेवराई असे मयताचे नाव आहे शहरातील एका नामंकीत हॉटेलवर आचारी म्हणुन काम करत होता दि 12 रोजी रात्री शहरात बाहेरील मांगिरबाबा स्मशान भूमीजवळ मयताची मोटार सायकल आढळली होती तेथुन 1 किलोमिटर अंतरावर दि 13रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला आहे टी,एम,सी परिसरातील गायरानात मृत अवस्थेत पडलेला मृत्यूदेह सापडला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी जावुन पंचनामा केला पुढील कारवाई साठी मृतदेह उत्तरणीय तपासनीस,शवविछेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता आहे सदर तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे घातपात आहे का? नाही याबाबद गेवराई पोलिस तपास करीत आहेत.