विवेकी विचारांचे पाईक अन् शब्दांचे स्वामित्व प्राप्त वैभव संपन्न संपादक : वैभव विवेक स्वामी

0
167

विवेकी विचारांचे पाईक अन् शब्दांचे स्वामित्व प्राप्त वैभव संपन्न संपादक : वैभव विवेक स्वामी
मागील अनेक वर्षापासून माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे दैनिक समर्थ राजयोग संपादक वैभव विवेक स्वामी यांचा आज जन्मदिवस. आपल्या हातून नेहमीच सत्कार्य होवो तसे ते नेहमीच होत असते. पण विशेष गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना शासन प्रशासन यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी सतत धडपडत असणारे माणसं क्वचितच आढळतात यापैकीच आपण एक. आपल्या वाढदिवसादिवशी वरून राजाने देखील मनमोकळेपणाने हजेरी लावून वाढदिवसाला आणखीनच यादगार बनवले यात शंका नाही.
मागील तीन वर्षांपासून दुष्काळाने झुरत असलेला आपला बीड जिल्हा आज वरून राजाच्या कृपेने जसा सुखावला तसाच आपल्या वाढदिवसानिमित्त चांगल्या कृत्याने अनेक गोरगरिबांची कामे मार्गे लागू तेही सुखावत रहावो अशी प्रार्थना!
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण आनंदात जगावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या जिद्दीला पण सलाम. मागील दहा वर्षापासून स्वतःचे दैनिक चालवणे हे मोठे फार जिकरीचे काम आहे. बराच काळ उलटला पण आपली जिद्द मात्र कमी झाली नाही. आजपर्यंत ते दैनिक निर्विवादपणे चालवले. म्हणजे संघर्ष काय असतो ते आपल्याकडून शिकायला हवे. आपल्या संघर्षाच्या काळात आम्ही छोटी का होईना दिलेली साथ अजूनही विसरला नाहीत हे विशेष. आपल्या दैनिकाने भले आज कितीही प्रगती केली असली तरी आपण जुन्या माणसांना विसरत नाहीत हे आपली खासियत हीच. आपुलकी कायम राहो एवढी सदिच्छा!
आपल्या कष्टाच्या आणि संघर्षमय जीवनातून यशाची शिखरे पार करावीत. तर याच शिखरात अन् येणार्‍या प्रत्येक क्षणाला प्रगतीच्या इंद्रधनुष्याची काठ असावी हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा !

  • शेख ए.आर.
    संपादक, सा.लोकनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here