गेवराई तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ; ग्रामस्थ झाले भयभयीत

0
1115

श्रीपत अंतरवाला परिसरात वासराचा पाडला फडशा

गेवराई, (प्रतिनिधी):- गुरुवार रोजी गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सदरील बिबट्याने आंतरवाला येथील शेतकरी बाळासाहेब आर्दड यांच्या शेतातील गाईच्या वासराचा फडशा पाडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन सदरील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील भयभयीत झालेल्या ग्रामस्थांमधून आता होऊ लागली आहे.गुरुवार रोजी या परिसरात बिबट्याने मुक्त संचार केला असुन त्याचे अनेकांनी व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे समजते.याबाबत गेवराई व बीड वन विभागाने श्रीपत आंतरवाला परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.दरम्यान बिबट्याच्या दहशीतीमुळे आज शुक्रवार रोजी या परिसरातील अनेक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी शेतात व परिसरात फिरण्यास आवर घातल्याचे दिसून आले आहे.तर कामगार लोक देखील शेतात काम करण्यासाठी श जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here