आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील डॉ.सय्यद हुमायुद्दीन अल्लाउद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिक मध्ये दवाखान्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत दातांची तपासणी शिबिरात एकूण 51 रुग्णांवर मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.दि.07 जून 2023 रोजी माजी मंत्री तथा आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर, आ.बाळासाहेब आजबे,संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,कडा कृषी उत्पन्नचे अध्यक्ष रमजान तांबोळी,डॉ.विलास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ तथा उद्घाटन झालेल्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या प्रथम वर्धापन निमित्त आष्टी असो.चे माजी अध्यक्ष डॉ.मधुकरराव हंबर्डे,अशोक देवा जोशी, महाराष्ट्र मेडिकलचे मालक हुसेन भाई,डॉ.पंकज इजारे,सय्यद शिराजुद्दीन,सुखलालजी मुथा,जालिंदर पोकळे,सरपंच पंडित पोकळे, हाजी हरून शेठ,माजी सरपंच अशोक पोकळे पत्रकार मुजाहिद्दीन यांनी डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकला प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.