समाज माध्यमांवर विषमतेला थारा देऊ नका समता परिषदेचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) मागच्या काही दिवसांपुर्वी लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे निवडणूक झाल्यानंतर देखील अनेक नव – युवक समाज माध्यमांवर अक्षपार्य पोस्ट , एखाद्या समाजावर खालच्या पातळीवर मजकूर करताना दिसत आहेत. असे केल्याने समाजा समाजात पोकळी निर्माण होत आहे. अशा पद्धतीच्या आक्षेपार्य पोस्ट समाज माध्यमांवर कोणी करू नये असे आवाहन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष (भाऊ) राऊत यांनी केले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचे मतदान हे एकुण सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यात (१३) मे रोजी संपन्न झाले . पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष यावेळच्या बीड लोकसभा निवडणुकीकडे लागलेले पहायला मिळाले होते. या मागचे कारण पहायचे झाले तर मतदानाच्या काही काळापूर्वी झालेल्या संघर्षामुळे ही निवडणूक जातीय मुद्द्यांवर होण्याचे संकेत स्पष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे यावेळची निवडणुक कसरतीची ठरणार असल्याचे चित्र तयार झालेले होते. या निवडणुकी वेळी पक्षाचा प्रचार असो की, उमेदवाराचा हा जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर केलेला दिसून आला त्यावेळी उमेदवारांच्या समर्थकांकडून त्यांच्या उमेदवारांनी केलेला संघर्ष, उमेदवारांनी दिलेली आश्वासन, उमेदवारांनी केलेली विकासकामे आशा पोस्ट करत एक प्रकारे समाज माध्यमांवर देखील प्रचाराची रणधुमाळी रंगलेली पाहायला मिळाली होती.
निवडणुका काळ समाप्त झाल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी तसेच चाहत्यांनी आपल्या उमेदवारांची ऐकलहाती बाजू लावून धरलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शहरात तसेच गावांमध्ये तणावाचे वातावरण मागच्या काही दिवसापासून निर्माण होऊ लागले पहायला मिळत आहे या तणावाच्या वातावरणामुळे समाजा समाजात दूही निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत .अशा पद्धतीची दुफळी दोन समाजात निर्माण होऊ नये ,तसेच समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे कोणत्याही समाजाची मने दु:खावली जाऊ नये यासाठी सर्व युवकांनी सलोखा, बंधुत्व संबंध जोपासावे तसेच समाज माध्यमांवरील विषमतेच्या मजकुरांना कोठेही थारा देऊ नये असे आवाहन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष सुभाष (भाऊ) राऊत यांनी केले आहे.