आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय नेहमीच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि राष्ट्रीय कार्यक्रम राबवून रुग्ण सेवा देण्यासाठी तत्पर राहिले आहे.हेच उद्दिष्ट ठेवून आष्टी ग्रामीण रुग्णालयात दिनांक 16 मे रोजी बिन टाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.ग्रामीण रुग्णालय आष्टी साठी दिलेले दीडशे लाभार्थ्यांचे वार्षिक उद्दिष्ट अवघ्या एका महिन्यामध्ये ग्रामीण रुग्णालयात सर्व टीमने सहजरीत्या पार पाडले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे यांच्या नियोजनात डॉ.सावंत, डॉ.मस्तुद,डॉ.डोंगरे,डॉ.ढाकणे,डॉ.गुट्टे,डॉ.घोडके यांच्या मदतीने हे अति भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शस्त्रक्रिया शिबिराचा खेड्यापाड्यातील सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी परिसेविका बेबी शेख,अर्चना घोडके,अधिपरिचारिका स्नेहल राऊत,रत्ना बनकर,प्रतिभा साळवे,आशफीया शेख,निकिता कोळी,संध्या धुमाळ,अशोक भुसनर,वैभव येडे, तसेच कर्मचारी शुभम,प्रतीक,गणेश,प्रीती काळे, वृषाली काशीगीर,बबन भवर,जयचंद नेलवाडे या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने उद्दिष्ट पार पडले.या उद्दिष्ट मूर्तीबद्दल आष्टी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.