कु. रुचिता कैलास वाघ हीला MBBS परीक्षेत घवघवीत यश

0
580

नांदेड प्रतीनीधी – उज्वला गुरसुडकर

मालेगाव येथील कु. रुचिता कैलास वाघ या विद्यार्थिनीने MBBS परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले नाभिक समाजांतील या कन्येने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण क्षेत्रांत जिद्द व चिकाटी अथक परिश्रमाच्या बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्नं साकार केले आहे.

कु. रुचिता चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालेगाव शहरांतील रुक्मिणीबाई झुंबरलाल काकाणी विद्यालय येथे झाले. कु. रुचिता ने इयत्ता दहावीला ९४% गुण मिळवून प्रथम श्रेणीतील गाठला होता.

आणि तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला होता. नाशिक येथील आर. वाया. के कॉलेज मध्ये बारावी सायन्समध्ये केल्यानंतर कु. रुचिता ने डहाणू येथील वेदांत मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेवून एम.बी.बी.एस प्रतीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले.
सध्या यांचं कॉलेज मध्ये इटर्नशिप करतं आहे.

कु. रुचिता ही मालेगाव शहरांतील रहिवासी कै. विठ्ठलराव फकीरा वाघ (कंडक्टर) व श्रीमंती ठगूबाई विठ्ठलराव वाघ यांची नातं असून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत असलेलें श्री. कैलास विठ्ठलराव वाघ यांची कन्या व श्री. मधुकरराव विठ्ठलराव वाघ यांची पुतणी आहे. श्री. कैलास वाघ व सौ. संगिता वाघ यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. कु. रुचिता ने ही आपल्या कौटुंबिक परिस्थिती ची जाणीव ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रांतील MBBS ही उच्च पदवी मिळवून मालेगाव शहरांत नाभिक समाजांतील प्रथमच महिला डॉक्टर होउन नाव लौकिकार्थ मिळविला आहे.

            वाघ परिवारातील तसेच मालेगाव शहरात व तालुक्यात नाभिक समाजातील बहुसंख्य बांधवांना हे अंत्यंत स्वाभिमानाची व अभिमानास्पद बाब ठरली आहे. 

            डॉ.  रुचिता कैलास वाघ यांच्या या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल मालेगाव शहरातील नाभिक समाज संघटनांनी, नाभिक टायगर सेना, मालेगाव तसेच नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रांतील नासिक समाज बांधव व बहुजन समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे. कु. रुचिता ला पुढील शिक्षणाची वाटचाल  वैद्यकीय क्षेत्रांत प्रचंड यश मिळो व तिची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवोत  अशी नाभिक मंच परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here