गेवराई विधानसभा मतदारसंघात 65% मतदान

0
355

5 वाजेपर्यंत 63% टक्के मतदानाची आकडेवारी

किरकोळ वाद – विवाद वगळता, चोख पोलीस बंदोबस्तात, शांततेत पार पडले मतदान

गेवराई


39 बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दि.13 मे. रोजी गेवराई विधानसभा मतदारसंघात 65 % टक्के मतदान झाले असून, किरकोळ अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळ पासून मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले. मतदारांनी उत्साह दाखविला असून, मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मतदानाचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का ? या विषयी दोन्ही गटाकडून आकडेमोड केली जात आहे. दरम्यान, जबरदस्त निवडणूक यंत्रण आणि चोख पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया “निर्विघ्न” पार पाडण्यात निवडणूक विभागाला यश आले आहे.

 गेवराई मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. आभाळ भरून आल्याने वातावरणात उष्णता होती. मात्र, कडक ऊन नव्हते. त्यामुळे,

नागरीकांनी सकाळीच घरा बाहेर पडून, मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. गेवराई शहरात सर्वाधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे.

गेवराई मतदारसंघात
397 मतदान केंद्र, दोन हजार 666 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तीन लाख 64 हजार 823 मतदानापैकी, पाच वाजेपर्यंत 63% मतदान झाले. तीन हजार 464 नवीन मतदारांना पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळाल्याने,
टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
गेवराई लोकसभा मतदारसंघात रामनाईक तांडा, हरीलाल नाईक तांडा, वडगांव गुंधा , अशी तीन संवेदनशील केंद्रे होती. पिंक महिला केंद्र पाच व दिव्यांग केंद्र उभारण्यात आले होते.
गेवराई मतदारसंघात एक लाख 93 हजार 45 पुरुष मतदार, एक लाख 71 हजार 768 महिला मतदार व दहा तृतीय पंथी मतदार असून एकूण तीन लाख 64 हजार 823 मतदारांपैकी 65% मतदारांनी
उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद करून, मतदानाचा हक्क बजावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here