गेवराई (प्रतिनिधी)
गेवराई येथील समर्थ संगीत विद्यालय च्या वतीने गेवराई शहर व परिसरातील सांस्कृतिक , शैक्षणिक व संगीत क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तीला “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” देऊन गौरविण्यात येते, यावर्षीचा 4 था “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” गेवराई येथील संगीत साधक व संगीत शिक्षक यांना शैक्षणिक व संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांचा हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, यावेळी समर्थ संगीत विद्यालय, गेवराई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या परिक्षेत सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले, याप्रसंगी मान्यवर मा. श्री गंगणे सर, प्राचार्य घुमरे अध्यापक विद्यालय, गेवराई मा. श्री प्रा. डॉ.हनमंत हेळंबे सर लोकप्रशासन विभाग प्रमुख आर. बी.अट्टल गेवराई.मा. श्री अमोल वैद्य, संपादक साप्ताहिक बीड राज्यकर्ता.मा. श्रीमती योगिता चव्हाण मॅडम, घुमरे माध्यमिक विद्यालय, गेवराई व संगीत विद्यालय चे प्राचार्य श्री गाडेकर सर तसेच विद्यालय चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून मान्यवरांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले, यामध्ये आयवन वंजारे, म्युरीयल भोसले, मार्विन भोसले,वैभवी पाठक, कौस्तुभ मोरे, श्रीशा फुलझळके , प्रांजल खराद व वैष्णवी गाडेकर यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मा. गंगणे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.