बीड : हैदराबाद येथील व्यक्तीने परळी येथील विटभट्टी चालकाकडून 25 लाख रुपयांच्या विटा नेल्या होत्या. त्या बदल्यात त्याने 14 लाख रुपयांचा चेक दिला होता. सदरील हा चेक वटला नाही. व्यावसायिकाची फसवणूक झाल्याने याबाबत संबंधिताविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख मकसुद मुजीब शेख या विटभट्टी व्यावसायिकाकडून हैदराबाद येथील खैसर अकबर पठाण याने 39 लाख 2 हजार 700 रुपयांच्या विटा नेल्या होत्या. त्यापैकी 25 लाख रुपये फिर्यादीच्या खात्यावर पाठविण्यात आले. त्याच्याकडे 14 लाख 2 हजार रुपये बाकी राहिले होते. त्यापैकी 11 लाख 42 हजार रुपयांचा चेक देण्यात आला होता. सदरील चेक वटला नाही. एकूण 14 लाख 700 रुपयांची फसवणूक संबंधित विटभट्टी मालकाची झाली होती. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home Uncategorized विटभट्टी मालकाला चौदा लाखाला चुना;विटा नेल्या, चेक वटलाच नाही, आरोपीविरोधात गुन्हा दाखल