गेवराई तालुक्यातील घटना
गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील गोदाकाठची गंगावाडी येथील केशव मुरलीधर चिकणे (वय ३१) हा शेतकरी शनिवार रोजी सकाळी शेतात ज्वारी काढत असताना मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असल्याने व काम करत असतानाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन झाले आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले आहेत.त्याच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्याक्त होत आहे.दरम्यान उष्माघाताचा गेवराई तालुक्यातील पहिला बळी ठरल्याचे बोलले जात आहे.