ऑल इंडिया सैनजी समाज ट्रस्टचे नई दिल्ली धुळे जिल्हा अध्यक्ष पदी रामचंद्र येशी तर उपाध्यक्ष पदी रविंद्र खोंडे सर यांची निवड

0
354

नांदेड प्रतिनिधी उज्ज्वला ताई गुरसुडकर

   धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली यांची सहविचार सभा संस्थापक अध्यक्ष एम. एस.ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23- 3-2024. रोजी घेण्यात आली.ऑल इंडिया सैनजी ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. एस. ठाकूर उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नाभिक समाजाच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत संवाद साधण्यासाठी संघटन विस्तार करण्यासाठी नाशिक, धुळे ,जळगाव व खासकरून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यानिमित्ताने एम.एस. ठाकूर साहेब व राष्ट्रीय स्तरावरील सर्व पदाधिकारी व शिरपूर सुवर्णनगरीमधील सर्व समाज बांधव यांची शिरपूर येथील गुजर भवन या ठिकाणी सहविचार सभा व नाभिक समाजातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यावेळेस ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्टच्या सर्व राष्ट्रीय स्तरावरचे पदधिकाऱ्यांच्या साक्षीने जिल्ह्यातील संघटन विस्तार करण्यात आला.त्यात सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री.रामचंद्र येशीसाहेब यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी रविंद्र खोंडे सर यांची निवड झाली.त्याचप्रमाणे जिल्हा सहसचिव म्हणून रामचंद्र नारायण पवार तर सहसचिव 2 म्हणून गोपाल वरसाळे , रविंद्र रामदास सोनगिरे यांचे जिल्हा संघटक पदी निवड झाली.तर धुळे जिल्हा महिला युवा अध्यक्ष म्हणून निशीगंधा वैभव चित्ते तर धुळे जिल्हा महिला युवा उपाध्यक्ष म्हणून प्रमिला कैलास खोंडे यांची निवड करण्यात आली.शिवाय नंदलाल काशिनाथ वारुळे यांची तालुकाध्यक्ष तर गणेश रघुनाथ येशी यांचे तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तालुका सहसचिव म्हणून प्रताप सोनवणे तर गोपाल सुरेश सैंदाणे संघटक म्हणून तर सी.के महाले सर यांची तालुका कार्याध्यक्ष तर जितेंद्र सनेर यांची तालुका कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. शिवाय बापू तुकाराम येशी यांची जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
        सर्व मान्यवरांना संस्थापक अध्यक्ष एम एस ठाकूर साहेब यांनी संघटनेचे नियुक्तीपत्र व पदभार दिला. सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढवण्याचे वचन यावेळी संस्थापक अध्यक्षांना दिले.

सदर नियुक्ती प्रसंगी शिरपूर शहरातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्रीरामचंद्र येशी साहेब यांच्या सोबत ऑल इंडिया सेनजी समाज महासंघ ट्रस्ट { नई दिल्ली} मधे विविध पदावर जाहीर प्रवेश केला

तयावेळी ऑल इंडिया सेन जी महासंघ ट्रस्ट नई दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष श्री एम. एस.ठाकूर सर , राष्ट्रीय सहसचिव श्री. राजकुमार गवळी सर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोहरजी खोंडे सर , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवराज सैंदाणे, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव गोकुळ नाना येशी,भरत दादा येशी, महाराष्ट्र प्रदेश संघटक जगदीश सोनगडे,महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख श्री.भरतजी शिरसाठ सर, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री. दिलीपजी येशी सर व उपस्थित सर्वच तोला मोलाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here