राजकारणातील आयडॉल नेतृत्व- आदितीताई तटकरे
राजकारणाच्या माध्यमातून वारसा,जोपासत ,समाजकारण करण्याची उर्मी असणारी तरुणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत , संघटन कार्य परिश्रम घेत राजकिय क्षेत्रात अवघ्या वयाच्या 33 व्या वर्षी एक आदर्श तरुण मंत्री म्हणून स्वतःला सिद्ध करत हा प्रवास निश्चितच थक्क करणार आहे विशेष विकास कामासाठी दृष्टी लाभलेले नेतृत्व,सतत लोक कल्याणकारी विचार, विश्वास,आपुलकीने विचारपूस, लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न आपल्याला दिसून येतो विकास कामाची.अवभुतपूर्व दृष्टी नेतृत्वाला लाभले आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्याविषयी बोलायचं झाले तर असेच अनेक लेख कमीच पडतील अशा युवा नेतृत्व आदितीताई सुनील तटकरे होय
आदिती ताई तटकरे यांनी एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतलं आहे.जिल्हा परिषदेची निवडणूक.लढवण्यापूर्वी पासूनच आदिती ताई राजकारणात सक्रिय आहेत. 2008-2009.मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. 2011-2012.मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तरुणींना राजकारणात येण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षात काम करण्यास सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. 23 फेब्रवारी 2017.रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या.21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिले.आदितीताई तटकरे या अवघ्या 33 वर्षाच्या आहेत.वयाच्या 31व्या वर्षीच त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे.त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन,क्रिडा व युवक कल्याण,राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या खात्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या.अदिती सुनील तटकरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ नातं घट्ट पकडून त्या प्रमाणिक राजकारणात सक्रिय आहेत विशेष म्हणजे 2017 – 2019.च्या कालावधीत अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद,2019 – श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य निवडून आल्या तसेच २०२३ पासून शिंदे सरकारमध्ये आणि २०१९-२०२२ पर्यंत ठाकरे सरकारच्या महाराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम केले. त्या रोहा येथील आहेत आणि त्या श्रीवर्धन मधून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.24 ऑक्टोबर 2019 रोजी. त्यांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी आमदार म्हणून शपथ घेतली…..
महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे नेते,खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती ताई तटकरे अनेक खात्यांचा भार त्या सांभाळत असून या खात्यांना त्या न्यायही देत आहेत. कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो,तौक्ते वादळ असो की काही दिवसांपूर्वी आलेला महाड-चिपळूणमधील पूर असो. प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची ओळख आहे.त्यांनी त्यांच्या विषयीच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या.मी शाळेत असताना वर्गात कमी वर्गाच्या बाहेर अधिक राहणारी विद्यार्थीनी होते. पण स्पोर्ट्सअॅक्टिव्हिटीमध्ये क्रियाशील होतं,असं त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं.वडील राजकारणात होते.त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण होतं.त्या वातावरणात वाढल्यानेच राजकारणाकडे ओढले गेले. विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली.शरद पवार साहेबाकडे सर्व पिढ्यांशी संवाद साधण्याची कला आहे.शरद पवार साहेब हेच माझे राजकारणातील रोल मॉडल आहेत आदिती ताई नेहमी सांगत असतात.आदिती ताई नेहमीच साध्या ड्रेसमध्ये दिसतात.त्यांच्या ड्रेसची चॉईसही हटकेच.त्या साधारण पणे साध्या कॉटनचे पण सोबर दिसणारे,फिकट रंगाचे ड्रेस पसंत करतात.त्यांच्या या साध्या लुकमुळेच त्यांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांची क्रेझ आहे.त्या राजकारणी,मंत्री असल्या तरी सगळ्यांसोबतच अतिशय आदराने बोलतात. त्यांच्या याचं साधेपणा मुळेच सर्व राजकीय पक्षांशी सहजपणे कनेक्ट वाढतं आहे आदिती ताई यांच्या खूप साध्या,स्वस्तातल्या आणि नाजूक घड्याळाची कहाणी तितकीच निराळी, आपुलकीची,मायेची आहे ! या घड्याळाचा ‘लुक’ साधाच आदितीताई यांचं व्यक्तीमत्त्व केवढ्या साधेपणात दडलयं हेही नजरेपुढं आणतं.तसेच आत्ताच्या झालेल्या राजकीय राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर घडामोड घडली.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले तर आदिती ताई तटकरे यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली.यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नव्हत्या आता राष्ट्रवादी सोबत आल्याने आदिती ताई तटकरे यांना शिंदे- फडणवीस सरकार मधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.असो वडील अनेक वेळा आमदार,मंत्री,खासदार व भाऊ आमदार असा घरात वारसा असताना देखील आदिती ताई तटकरे यांच्यामध्ये साधेपणा व गोरगरीब लोकांचे काम करण्याचा ध्यास मनात एक वेगळेपणा असून राजकीय वारसा असताना देखील जमिनीशी नातं आजत्यात देखील आहे.मंत्रिपद असताना कायम त्या यशस्वीरित्या काम पार पाडत आहे त्यामुळे त्यांची एक वेगळी मंत्रिमंडळातील भूमिका व एक महिला व बालविकास मंत्री म्हणून महाराष्ट्रभर त्यांच्या कामाची एक वेगळी ख्याती निर्माण झाली असून तसेच आत्ताच घेतलेल्या निर्णयापैकी एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे “आईचे नाव” वडीला अगोदर लावण्याचा शासन निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला त्यामुळे त्यांची एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी वयात महिला व बालविकास मंत्री म्हणून केलेल्या कामाची पावती ही त्यांची एक वेगळी ओळख म्हणून ओळखले जात आहे त्यामुळे त्यांचे घराणेशाहीचे राजकारण बघता व वारसा प्रमाणे असलेले राजकारणी तरी देखील सर्वसामान्याशी असलेली नाळ त्यांची कधी कमी होतांना दिसत नसल्याचे स्पष्ट अनेक वेळा दिसून आले आहे तरी ते आजही जमिनीशी आपले नाते कायम ठेवत आपली पुढील दिशा साठी कायम प्रयत्नशील आहेत असे स्पष्ट दिसत आहे.
पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐💐💐
लेखक – ॲड , श्री.गणेश कोल्हे
मो.9921447627
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240324-WA0044.jpg)