गेवराईतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे साईड पंखे न भरल्याने अपघाताची शक्यता; संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष

0
243

गेवराई (प्रतिनिधी )

गेवराई शहरातून जाणारा सहा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग वर्षभरापूर्वी त्याचे डांबरीकरण झाले परंतु साईड पंखे न भरल्याने आणि रस्त्याची उंची वाढल्याने बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत असे साईड पंखे संबंधित यंत्रणेने न भरल्यामुळे दररोज अपघात होऊन एखादी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही . धुळे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहर वसले आहे . गेवराई शहराच्या मध्यभागातून जाणारा सहा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरापूर्वी एका कंपनीने डांबरीकरण केले होते . डांबरीकरण केल्यामुळे रस्त्याची उंची फुटभर वाढली आहे . मुळातच दोन्ही बाजूचे पंखे खोल झाल्याने आणि रस्त्याचे बांधकाम करणाऱ्यांनी साईड पंखे न भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत . एखादी जीवितहानी झाल्यानंतरच अथवा एखादे वाहन पलटी झाल्यावर काही जणांचे बळी घेतल्यानंतरच हे साईड पंखे भरणार काय ? अशी चर्चा गेवराई शहरातील नागरिक संतापाने करत आहेत . वास्तविक हा रस्ता दुतर्फा होणे आवश्यक होतं परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी हा रस्ता दोन पदरीच झाला आहे . आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . त्यातच साईड पंखे खोल झाल्यामुळे आणि त्यामध्ये मुरूम किंवा दबाई न केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे ‘ अनेक लोकांचे पाय खाली -वर पडल्यामुळे मुरगळले आहेत तर काही दवाखान्यामध्ये दाखल आहेत .अशावेळी साईड पंखे भरणे अत्यंत गरजेचे असून याच मार्गावर कुठेही चांगले गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत .त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत चालली आहे . तकलादू गतिरोधन निघून गेले आहेत . दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक संभ्रमात आहेत . ताकडगावरोड वर हीच अवस्था—————- ——————— ———————–गेवराई शहर पंचायत समिती चौक ते ताकडगाव रोडच्या दिशेने गेल्या सहा महिन्यापूर्वी अंतिम लेअरचे डांबरीकरण झाले आहे परंतु अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर एकाही ठिकाणी गतिरोधक लावण्यात आलेले नाही . ना गतिरोधक ना दिशादर्शक फलक त्यामुळे वाळूच्या आणि मुरमाच्या भरलेल्या हायवा आणि ट्रॅक्टर भर धाव वाहने ताकडगाव रोडला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य भवितव्य धोक्यात आले आहे .या ताकडगाव रोडवर शाळा आणि कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गतिरोधकांची खूप आवश्यकता आहे . त्यामुळे त्वरित गतिरोधके बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here