आष्टी प्रतिनिधी
मौजे चिंचाळा हल्ली मुक्काम मुर्शदपुर,आष्टीचा सय्यद वलीयुद्दीन अल्लाउद्दीन याने बीएएमएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन,नेत्रदीपक यश संपादन केले आहे.तो संगमनेर,जि.अहमदनगर येथील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.तसेच आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील विज्ञान बारावीचा विद्यार्थी असून कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा धाकटा चिरंजीव आहे.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.गणेश पिसाळ,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,डॉ.निमिश सराफ,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,पर्यवेक्षक प्रा.आशोक भोगाडे,डॉ.अभय शिंदे, प्रा.आनंद देशमुखे,चिंचाळा ग्रामस्थ,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद,पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.