गेवराई (प्रतिनिधी) जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉईस चेअरमन पाटीलबा मस्के यांचे शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी दुपारी उपचारा दरम्यान वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले. शनिवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी 11 वाजता रामपुरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे जेष्ठ सहकारी म्हणुन गेवराई तालुक्याच्या राजकारणात ओळख असलेले पाटीलबा मस्के यांनी रामपुरी गावचे सरपंच ते जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यासारख्या अनेक पदांवर काम केले. ते कांही दिवसांपासून संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवार दिनांक २२ मार्च रोजी त्यांची उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली. गेवराईच्या राजकारणात पाटीलला मस्के यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्था मध्ये काम केले. शिवछत्र परिवाराच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांचं सक्रिय सहभाग असे. त्यांच्या निधनाने गेवराई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सातत्याने आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारा एक जेष्ठ सहकारी हरवल्याची भावना जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली.
पाटीलला मस्के यांच्या पश्चात दोन मुली आणि जावाई, नातवंडे, आप्तेष्ट नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रामपुरी या गावी शनिवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.