संभाजीनगर प्रतिनिधी
वडगाव कोल्हाटी येथे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सापडल्याने परिसरात खबळबळ उडाली होती. अर्भक टाकणाऱ्याचा पोलीस शोध घेत असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करत आहे.
अर्जून हावनोर यांना वडगाव कोल्हाटी गट नं. २१, प्लॉट क्र. २६ मधील मोकळ्या जागेवर शनिवारी सायंकाळी एक अर्भक पडलेले स्थानिक नागरिकांनी दिसले असता त्यांनी पोलिसांना कळवले.दरम्यान,महिला पोउपनि स्वाती उचित,यांनी हे घटनास्थळी दाखल होत मृत अर्भकचा पंचनामा केला.मृत अर्भकास तपासणीसाठी घाटीत पाठविण्यात आले होते.अनैतिक संबंधातून अर्भकाचा जन्म होऊन कोणालाही कळू नये म्हणून ते मोकळ्या जागेवर फेकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हे अर्भक एका दिवसाचे जन्मलेले बाळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून,कोणास काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोउनि शिवाजी
घोरपडे यांनी केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी सदर मयतास शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतो.नातेवाई न मिळाल्याने त्या स्त्री जातीचा मृतांचे शव विच्छेदन करुन माणुसकी रुग्ण सेवा समुह समाजसेवक सुमित पंडित हे बेवारसांचे अंत्यविधीसाठी मदतकार्य करतात कळाल्यानंतर शिवाजी घोरपडे उप पोलीस निरीक्षक यांनी अंत्यविधी करण्यासाठी मदत मागितली व सदर बाळाचा दफनविधी बेगमपुरा स्मशानभूमी येथे माणुसकी टिम ने व वाळुज पोलीसांनी केला या कार्यासाठी शिवाजी घोरपडे उप पोलीस निरीक्षक वाळुज,हनिफ पटेल,नंदु काळे सामाजिक कार्यकर्ते वाळुज, समाजसेविका पुजा पंडित, सुमित पंडित आदींनी मदतकार्य केले.